Next
‘शाओमी’तर्फे भारतात स्मार्टफोन घटक उत्पादन
प्रेस रिलीज
Tuesday, August 07, 2018 | 04:39 PM
15 0 0
Share this story

आंध्र प्रदेश : शाओमी या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या स्मार्टफोन ब्रँडचा प्रमुख घटक पुरवठादार असलेल्या होलिटेक टेक्नॉलॉजीतर्फे भारतात कंपोनंट्सच्या म्हणजेच सुट्या भागांच्या उत्पादनाला सुरुवात केली जाणार असल्याची घोषणा कंपनीने केली. हॉलिटेक टेक्नॉलॉजीने आंध्र प्रदेश राज्यासोबत एक सामंजस्य करार केला असून, ते ‘शाओमी’साठी तिरूपती शहरात स्थानिक उत्पादन सुरू करतील.

हॉलिटेक टेक्नॉलॉजीकडून देशात पुढील तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे आणि ती भारतात कॉम्पॅक्ट कॅमेरा मोड्यूल्स (सीसीएम), थिन फिल्म ट्रान्झिस्टर (टीएफटी), कॅपासिटिव्ह टच स्क्रीन मोड्यूल (सीटीपी), फ्लेक्सिबल प्रिंटेड सर्किट्स (एफपीसी) आणि फिंगरप्रिंट सेन्सरचे स्थानिक पातळीवरील उत्पादन करणारी पहिली कंपनी ठरेल. येथील स्थानिक उत्पादन २०१९ च्या पहिल्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा असून, तीन वर्षांत येथे सहा हजारांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.

सुट्या भागांचा उत्पादन कारखाना तिरूपती शहरात ७५ एकर जमिनीवर पसरलेला असेल आणि दरवर्षी प्रत्येक घटकामागे ५० दशलक्ष उत्पादनाच्या क्षमतेसोबत ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करतील. या कारखान्यात सुमारे ५० टक्के क्लीन रूम असेल. आंध्र प्रदेशने पहिल्यांदाच ही सुविधा देऊ केली आहे. क्लीनरूम ही एक स्वकेंद्रित जागा असेल जिथे सूक्ष्मघटकांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि तापमान, आर्द्रता आणि दाब अशासारख्या पर्यावरणाच्या इतर निकषांचे नियंत्रण करण्यासाठी तरतुदी केलेल्या असतील.

आंध्र प्रदेशने उत्पादन कारखान्यांच्या स्थापनेसाठी विविध प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. त्यात कर, भूखंड आणि वीज सवलती असून, त्याचबरोबर इतर अनेक फायदेही आहेत.

माहिती तंत्रज्ञान मंत्री नरा लोकेश म्हणाले, ‘आंध्र प्रदेश हे भारतातील सर्वाधिक तरुण नवनिर्माणशाली राज्य आहे. या राज्यात तरुण उद्योजक आहेत आणि समान विचारसरणीच्या कंपन्यांसाठी ते एक आकर्षक ठिकाण ठरू लागले आहे. आमच्या अद्ययावत साधन सुविधात्मक प्रोत्साहनामुळे आंध्र प्रदेश ही गुंतवणुकीची आकर्षक संधी ठरले आहे आणि हॉलिटेक टेक्नॉलॉजीने राज्यात येऊन स्थानिक उत्पादनांसाठी बाजारात एक मोठी क्रांती सुरू केली आहे हे पाहणे ही अत्यंत आनंददायी बाब ठरली आहे.’

‘शाओमी’चे उपाध्यक्ष आणि शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू जैन म्हणाले, ‘शाओमीने देशात खूप मोठ्या प्रमाणावर वाढ अनुभवली आहे आणि भारतासाठी ‘हॉलिटेक’च्या योजनांमधून भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योगासाठी चालना मिळेल अशी आम्हाला आशा वाटते. हॉलिटेक ही कंपनी शाओमीसाठी महत्त्वाची जागतिक घटक उत्पादक असून त्यांच्या भारतातील प्रवेशाद्वारे स्थानिक उत्पादनांचे एक नवीन युग येईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगानिर्मिती होऊन इतर घटक उत्पादकही भारतात येतील. मेक इन इंडियाप्रति वचनबद्ध असलेला एक ब्रँड म्हणून आम्हाला संपूर्ण देशासाठी हा उपक्रम पुढे नेताना खूप अभिमान वाटतो आणि देशासाठी अत्यंत प्रामाणिक किमतीत प्रत्येकजण आवश्यक ती उत्तम दर्जाची उत्पादने उपलब्ध करून देतील अशी आशा आम्हाला वाटत.

हॉलिटेक टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फ्लेम चेन म्हणाल, ‘शाओमीची प्रचंड वाढ आणि स्थानिक पातळीवरील उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हाती घेतलेले उपक्रम यांच्यामुळे आम्हाला भारतात शाओमीसाठी घटक उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची प्रेरणा मिळाली. आंध्र प्रदेशात कॅमेरा मोड्यूल्स, टीएफटी, सीटीपी, एफपीसी आणि फिंगरप्रिंट सेन्सर्स यांच्या उत्पादनाद्वारे तसेच उच्च दर्जाचे क्लीन रूम बांधकाम करून उद्योगातील अनेक पहिल्या गोष्टी आणताना आणि भारतात घटक उत्पादनांच्या वाढीला चालना देताना खूप आनंद होत आहे. इतर घटक उत्पादकांसाठी एक उदाहरण समोऱ ठेवून आणि शाओमीच्या भारतातील वाढीचा भाग होऊन हा उपक्रम पुढे नेता येईल अशी आम्हाला आशा वाटते.’

शाओमी इंडियाने एप्रिल २०१८मध्ये एका अत्यंत आगळ्यावेगळ्या जागतिक सप्लायर इन्व्हेस्टमेंट समिटचे आयोजन केल्यानंतर हे घडून आले आहे. या समिटचे उद्दिष्ट आपल्या सर्वोच्च ५० जागतिक पुरवठादारांना भारतात स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आहे.

गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्याच्या उद्दिष्टाने पुरवठादारांनी राज्यात उत्पादन केंद्रे स्थापन करण्यासाठी संभाव्य ठिकाणांना भेट दिली होती. त्यांनी आंध्र प्रदेश राज्यालाही भेट दिली आणि येथे त्यांनी आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान मंत्री लोकेश आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली. त्यांनी येथे आंध्र प्रदेश राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योगातील संधींबाबत चर्चा केली. या वेळी पुरवठादारंनी श्री सिटी येथील फॉक्सकॉन उत्पादन सुविधांना आणि राज्यातील शाओमीसाठी स्मार्टफोन्सच्या उत्पादनांसाठी असलेल्या अलीकडेच घोषित झालेल्या कारखान्यांना भेट दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link