Next
अॅक्सिस बँक शारजामध्ये कार्यरत
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 03:43 PM
15 0 0
Share this story

अॅक्सिस बँकेच्या  शारजामधील कार्यालयाचे उदघाटन करताना भारताचे दुबईतील राजदूत विपुल, बँकेचे कार्यकारी संचालक राजीव आनंद आदी

शारजा : ‘अॅक्सिस बँक’ या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने संयुक्त अरब अमिरातीतील शारजा येथे प्रतिनिधी कार्यालय सुरू केले आहे. भारताचे दुबईतील राजदूत विपुल यांच्या हस्ते नुकतेच या प्रतिनिधी कार्यालयाचे उद्घाटन झाले. शारजातील प्रतिनिधी कार्यालय अॅक्सिस बँकेचे यूएईतील तिसरे कार्यालय आहे.

नवे प्रतिनिधी कार्यालय प्रामुख्याने अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) असलेल्या बँकेच्या रिटेल उत्पादनांना व सेवांना चालना देणार आहे. शारजा प्रतिनिधी कार्यालय एमिरेटमधील एनआरआयना सेवा देणार आहेच, शिवाय उत्तरेकडील अजमन, उम्म अल कुवैन, रास अल खैमाह व फुजैराह या एमिरेटमधील ग्राहकांनाही सेवा देणार आहे.

यूएईमध्ये जगातील सर्वात मोठी एनआरआय संख्या असून, ती अंदाजे ३३ लाख इतकी आहे. शारजा हे धाबी व अबुधाबी यानंतरचे तिसरे सर्वात मोठे एमिरेट आहे. शारजा एमिरेटमध्ये अंदाजे साडेसहा लाख एनआरआय राहतात. त्यापैकी अनेक जण दररोज प्रवास करून दुबईला कामानिमित्त जातात.

अॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजीव आनंद म्हणाले, ‘यूएई व भारत यांच्यादरम्यान रेमिटन्ससह वैयक्तिक बँकिंग व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शारजा येथे प्रतिनिधी कार्यालय सुरू केल्याने यूएईतील आमचे कार्य अधिक विस्तारले जाईल व या प्रदेशात बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा ग्राहकांसाठी सहज उपलब्ध होतील. दुबई, अबुधाबी व आता शारजामधील प्रतिनिधी कार्यालयांमुळे डीआयएफसीच्या दुबईतील शाखेद्वारे एनआरआय ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांना जोड मिळणार आहे.यूएई व भारत यांच्यातील रेमिटन्सची उलाढाल अंदाजे १२ अब्ज डॉलर आहे आणि त्यामध्ये अॅक्सिस बँकेचा हिस्सा अंदाजे २० टक्के आहे. यूएईतील बँकेच्या एनआरआय ग्राहकांकडून भारतात केल्या जाणाऱ्या रेमिटन्सचा वेग व कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने अॅक्सिस बँकेने यूएईतील ३१ बँका व एक्स्चेंज हाउसेसशी भागीदारी केली आहे.यूएईतील व्यवसायाबरोबरच, अॅक्सिस बँकेचे अन्य प्रतिनिधी कार्यालय ढाका येथे आहे आणि लंडनमध्ये परदेशी उपकंपनी आहे. बँकेच्या शाखा आशियाचे आर्थिक केंद्र असलेले सिंगापूर, हाँगकाँग, कोलोम्बो व डीआयएफसी-दुबई येथे असून आंतरराष्ट्रीय बाजारांत प्रवेश करणाऱ्या भारतीय कंपन्यांना याद्वारे कॉर्पोरेट क्रेडिट व ट्रेड फायनान्स सेवा दिल्या जातात.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link