Next
शहीदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी विशेष वेबसाइट आणि अॅप
BOI
Wednesday, April 19, 2017 | 09:00 AM
15 1 0
Share this article:

नवी दिल्ली : देशातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने एक नवीन तंत्रज्ञान खुले केले आहे. ‘भारत के वीर’ या नावाचे एक वेब पोर्टल आणि मोबाइल अॅप सुरू करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या जवानाला कर्तव्याचे पालन करताना वीरमरण आल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याची संकल्पना अभिनेता अक्षय कुमारने मांडली होती. त्या संकल्पनेच्या आधारे हे पोर्टल अलीकडेच सुरू करण्यात आले आहे.

या नवीन तंत्रज्ञान प्रणालीमुळे शहीद वीर जवानाच्या कुटुंबीयांना कोणतीही व्यक्ती सहजपणे आर्थिक मदत करू शकते. याअंतर्गत लष्करातील अथवा निमलष्करी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करणे शक्य होईल. नव्याने सुरू करण्यात आलेले हे वेब पोर्टल आणि मोबाइल अॅप यावर जवानांच्या नावाची सूची आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती देण्यात येणार आहे. शिवाय शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या बँक खाते क्रमांकाचाही त्यात समावेश असेल. त्याद्वारे कोणीही त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम सहज जमा करू शकेल.

या सेवेद्वारे एका कुटुंबाच्या नावावर जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा होऊ शकणार आहेत. १५ लाख रुपये नावावर जमा झाल्यानंतर त्या सदस्याचे नाव यादीतून वगळले जाईल. या व्यतिरिक्त गंभीररीत्या जखमी झालेल्या जवानांचीही नावे या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. वेबसाइट सरकारी असल्याने माहितीच्या सत्यतेबाबत शंका घेण्याचे काही कारण नाही.

मागील महिन्यात नक्षली हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना अक्षयकुमारने नऊ लाख रुपयांची मदत केली आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवालने प्रत्येक शहीद जवानाच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत केली होती.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search