Next
‘कामगारांच्या रोजगार, वेतन आणि सामाजिक सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध’
BOI
Wednesday, May 03, 2017 | 01:00 AM
15 1 0
Share this article:

बंडारू दत्तात्रेयनवी दिल्ली : ‘सरकारने श्रमाचे महत्त्व आणि कामगारांचे योगदान ओळखले असून, सरकार त्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. त्यांचा रोजगार, वेतन आणि सामाजिक सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,’ असे केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ‘वन आयपी-टू डिस्पेनसरीज’ आणि ‘आधार बेस्ड ऑनलाइन क्लेम सबमिशन’ या दोन योजनांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

‘वन आयपी-टू डिस्पेनसरीज’ योजनेअंतर्गत, ‘ईएसआयसी’ने विमा काढलेल्या व्यक्तीला स्वत:साठी एक आणि कुटुंबासाठी एक असे दोन दवाखाने निवडण्याचा पर्याय दिला आहे. या योजनेचा लाभ स्थलांतरित कामगारांना होईल. ‘आधार बेस्ड ऑनलाइन क्लेम सबमिशन’ योजनेअंतर्गत, ज्या ईपीएफ सदस्यांनी त्यांचा यूएएन कार्यान्वित केला आहे आणि ‘ईपीएफओ’शी आधार क्रमांक संलग्न केला आहे, त्यांना भविष्यनिर्वाह निधीचा अंतिम हिशेब (फॉर्म १९), निवृत्तिवेतन काढण्याची सुविधा (फॉर्म १०-सी) आणि भविष्यनिर्वाह निधीतून अंशत: रक्कम काढणे (फॉर्म ३१) यासाठी अर्ज करता येईल. सदस्यांना ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता येईल.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search