Next
‘तंदुरुस्त जीवनशैली विषयाचा अभ्यासक्रमात समावेश’
प्रेस रिलीज
Saturday, June 16, 2018 | 02:12 PM
15 0 0
Share this article:

‘बेस्ट मेटासर्ज २०१८’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर,  डॉ. शशांक शहा, डॉ. रवी वानखेडकर आदी मान्यवर.

पुणे : ‘तंदुरुस्त जीवनशैली ही अत्यंत आवश्यक असून, या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात केला जाईल,’ असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी (ता. १५) पुण्यात केले.

स्थूलता या विकारावरील आयोजित ‘बेस्ट मेटासर्ज २०१८’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी परिषदेचे संयोजक सचिव डॉ. शशांक शहा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ओबेसिटी प्रिव्हेंशन अँड कंट्रोल टास्क फोर्स’ची स्थापना या वेळी करण्यात आली. या परिषदेत जगभरातील सुमारे ३०० शल्यचिकित्सक सहभागी झाले असून, याचा समारोप १७ जून २०१८ रोजी होईल.

जय हिंद हायस्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर‘या ‘टास्क फोर्स’ने स्थूलता हा विकार रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करावी आणि स्वस्थ जीवनशैलीचे महत्त्व पटवून द्यावी,’ अशी सूचना जावडेकर यांनी या वेळी केली.

दरम्यान, जय हिंद सिंधू एज्युकेशन ट्रस्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या अनुदानित शैक्षणिक संस्था जय हिंद हायस्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते पिंपरी येथे करण्यात आले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, ट्रस्टच्या अध्यक्षा नलिनी गेरा आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search