Next
पुणे शहरात स्वच्छ भारत अभियान
प्रेस रिलीज
Saturday, December 15, 2018 | 04:15 PM
15 0 0
Share this story

पुणे : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पुणे रिजनल आउटरीच ब्युरो, केंद्रीय आवास व शहरी विकास मंत्रालय आणि पुणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पुणे शहरातील हडपसर, सिंहगड रोड आणि भवानी पेठ या तीन ठिकाणी १८, २० आणि २२ डिसेंबर २०१८ या दिवशी स्वच्छ भारत अभियान या विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१८ डिसेंबरला हडपसर येथील साधना विद्यालय, २० डिसेंबरला सिहंगड रोडवरील नारायणराव सणस विद्यालय आणि २२ डिसेंबरला भवानी पेठेतील रफी अहमद किडवई उर्दू हायस्कूल या ठिकाणी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत या अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

यामध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी (ओला व सुखा कचरा) हिरव्या व निळ्या कुंड्यांचा वापर, प्लास्टिकचा वापर बंद करणे, नद्यांची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, हगणदारीमुक्त शहर, आपल्या आजूबाजूचा परिसर व रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य, तसेच स्‍वच्‍छता आणि वैयक्तिक आरोग्‍य आदी महत्त्वाच्या मुद्यांवर या अभियानाद्वारे जनजागृती करण्यात येईल. शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतून या अभियानाविषयी चित्रकला आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातील विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

पुणे रिजनल आउटरीच ब्युरोतर्फे सांस्‍कृतिक कार्यक्रमाद्वारे स्वच्छता जनजागृती, महापालिकेद्वारे शहरातील स्वच्छतेविषयी माहिती, तसेच स्वच्छता अभियान राबवून विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

या अभियानाला पुणे महापालिकेचे लोकप्रतिनिधी, पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पुणे येथील माहिती प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरिच ब्युरो संचालक संतोष अजमेरा, पुणे महानगरपालकेचे सह आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, विविध विद्यालय-महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मुखाध्यापक, तसेच विविध विभांगांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या अभियानात पुणे शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फिल्ड आउटरीच ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link