Next
ऑडबनमध्ये हिंदू स्वयंसेवक संघातर्फे गुरुवंदना कार्यक्रम
BOI
Friday, May 31, 2019 | 04:32 PM
15 0 0
Share this article:ऑडबन (पेनसिल्व्हानिया) :
अमेरिकेत मे महिना हा शिक्षकांच्या कार्याचे कौतुक (टीचर्स अॅप्रिसिएशन मन्थ) करण्याचा महिना म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने हिंदू स्वयंसेवक संघाच्या ऑडबन (पेनसिल्व्हानिया) शाखेने वार्षिक गुरुवंदना कार्यक्रम १९ मे रोजी आयोजित केला होता. वर्षभर शिक्षक विद्यार्थ्यांवर जी मेहनत घेत असतात, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते.या कार्यक्रमाला १८ शिक्षक, दोन प्राचार्य, एक जिल्हा अधीक्षक, विद्यार्थी सेवा विभागाचे जिल्हा संचालक आणि पेनसिल्व्हानियाच्या ४४व्या जिल्ह्यासाठीच्या सिनेटर केटी मथ आदी मान्यवर उपस्थित होते. सुमारे १३० व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.शिक्षक अज्ञानाचा अंधःकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्यांना खूप आदराचे स्थान आहे. गुरुवंदना कार्यक्रमात शिक्षकांचा पारंपरिक हिंदू पद्धतीने सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यांनी हिंदू संस्कृती आणि धर्म या विषयांशी संबंधित असलेल्या अनेक मुद्द्यांवर तयार केलेली सादरीकरणे शिक्षकांना कार्यक्रमाला आल्यावर पाहता आली. केटी मथ यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. काही हलकी योगासने आणि मजेशीर खेळांमध्ये शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यानंतर, हिंदू परंपरेमध्ये असलेले गुरुवंदनेचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर मुलांनी संस्कृत श्लोक, ऋचांचे पठण केले. हिंदू लोक गुरूंना देवासमान मानतात आणि त्यांना जीवनातील सर्वोच्च स्थान असते, अशा आशयाच्या श्लोकांचे पठण त्यांनी केले. त्यानंतर एका भक्तिगीतावर आई आणि मुलींच्या जोड्यांनी सादर केलेल्या पारंपरिक लेझीमनृत्याचा आस्वाद साऱ्यांनी घेतला. त्यानंतर मुलांनी शाखेत घेतलेल्या धड्यांच्या आधारे बासरी, व्हायोलीन, व्हायोला या वाद्यांचे वादन केले. त्यानंतर पारंपरिक वेशभूषेत सादर झालेल्या भरतनाट्यम् नृत्यालाही उपस्थितांची दाद मिळाली.त्यानंतर पारंपरिक हिंदू पद्धतीने गुरूपूजन करण्यात आले. शिक्षकांना विद्यार्थ्यांनी कुंकुमतिलक लावला, आरती ओवाळली आणि त्यांना खाली वाकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रेमाचे प्रतीक म्हणून फुले आणि काही भेटवस्तूही शिक्षकांना देण्यात आल्या.या मुख्य कार्यक्रमानंतर पाहुण्यांना त्यांचे विचार मांडण्याची विनंती करण्यात आली. ‘या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद झाला. वसुधैव कुटुंबकम् अर्थात अख्खे जग हे एक कुटुंब आहे, हे हिंदू तत्त्वज्ञान जाणून घेता आले. हे तत्त्वज्ञान आपण आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने वापरायला हवे, असे मला वाटते. इतरांशी आदराने वागण्याचा संदेश यातून मिळतो,’ असे उद्गार सिनेटर मथ यांनी काढले. या कार्यक्रमातून आपल्याला हिंदू संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आणि अनुभवता आली, असे कौतुकोद्गार शिक्षकांनी काढले.रुचकर, शाकाहारी भारतीय मेजवानीने कार्यक्रमाची सांगता झाली. एकमेकांशी गप्पा मारत, परस्परांना समजून घेत सर्वांनी भोजनाची मजा लुटली.(To read this news in English, please click here.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 71 Days ago
Is this a regular , annual event ? Best wishes .
0
0
L. S. PRABHUMIRASHI About 136 Days ago
EXCELLANT. & INSPIRING.
0
0

Select Language
Share Link
 
Search