Next
युवा ग्राहकांची प्लॅटिनमला वाढती पसंती
प्रेस रिलीज
Tuesday, May 22 | 12:12 PM
15 0 0
Share this story

पुणे : तरुण ग्राहक आणि लग्नसराई, यामुळे २०१८ मध्ये प्लॅटिनमची मागणी वाढणार आहे. असा निष्कर्ष प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनल (पीजीआय) ने प्रकाशित केलेल्या ‘प्लॅटिनम ज्वेलरी बिझनेस रिव्ह्यू’ मध्ये नोंदवण्यात आला आहे. 

हा अहवाल प्लॅटिनम बाजारपेठेतील तज्ज्ञ व विश्लेयषकांनी तयार केला असून, २०१७ मध्ये भारत, अमेरिका आणि जपान येथे प्लॅटिनमच्या रिटेल विक्रीमध्ये वाढ झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. 

प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हुव डॅनियल
‘२०१७ मध्ये चार महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी तीन बाजारपेठांमध्ये प्लॅटिनम ज्वेलरीच्या मागणीमध्ये वाढ झाली. बळकट होत जाणारी जागतिक अर्थव्यवस्था व प्लॅटिनमच्या किंमतीत ऐतिहासिक नीचांक आणि युवा वर्गाची प्लॅटिनमला मिळणारी वाढती पसंती यामुळे प्लॅटिनम ज्वेलरीच्या मागणीत वाढ झाली आहे. २०१८ मध्येही हाच कल कायम असेल आणि मागणीत चांगली वाढ होईल’, असे प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हुव डॅनियल यांनी सांगितले.

‘भारत जगभरात प्लॅटिनम ज्वेलरीच्या मागणीचे महत्त्वाचे केंद्र बनला आहे. नवीन आव्हाने असूनही, प्लॅटिनमच्या रिटेल विक्रीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फॅब्रिकेशनची मागणीही ३४ टक्क्यांनी वाढली आहे. भारतामध्ये प्लॅटिनम ज्वेलरीच्या मागणीमध्ये वाढ होण्यासाठी तरुण ग्राहकांची असलेली पसंती हे ही एक महत्त्वाचे कारण आहे. भारतातील तरुणांसाठी पीजीआयने प्लॅटिनम विरुद्ध सोने अशी भिन्न स्थिती निर्माण केली असून, आधुनिक जोडप्यांची पसंती प्लॅटिनम दागिन्यांना मिळत आहे. ‘प्लॅटिनम डेज ऑफ लव्ह कॅम्पेन’च्या माध्यमातून प्लॅटिनम आजच्या भारतीय युवा ग्राहकांच्या पसंतीचा धातू ठरला आहे. जगभरात भारत, चीन, जपान आणि अमेरिका या देशांमध्ये प्लॅटिनम ज्वेलरीसाठी ब्रायडल मार्केटने आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे’, असेही हुव डॅनियल यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link