Next
उलगडले समकालीन हिंदी कवितांचे जग
BOI
Monday, March 12, 2018 | 12:02 PM
15 0 0
Share this story

दादर (मुंबई) : साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे ‘कवितासमय’ ही वर्तमानातील अस्वस्थता व्यक्त अरणाऱ्या समकालीन हिंदी कवितांची मैफल १० मार्च रोजी दादरच्या साने गुरुजी विद्यालयात झाली. या कार्यक्रमाची संकल्पना ज्येष्ठ कवी, चित्रकार, समीक्षक गणेश विसपुते यांची होती. गजानन परांजपे, वंदना बोकील-कुलकर्णी, मेघा देशपांडे आणि अक्षय वाटवे यांनी खास शैलीमध्ये कवितांचे सादरीकरण केले. 

‘कवितेचा रियाझ टिकला, तर माणुसकीचा रिवाज टिकतो,’ असे सांगून गणेश विसपुते यांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर ‘लिखी जानी चाहिए कविता’ या कवितेसोबत या मैफलीचा प्रवास सुरू झाला. राजेश जोशी, उदय प्रकाश, मंगेश डबराल, विष्णू खरे, केदारनाथ सिंह, विनोद कुमार शुक्ल आणि अदनान दर्वेश यांच्या कविता या मैफलीत सादर करण्यात आल्या. चंद्रकांत देवताले यांची ‘दक्षिण दिशा,’ राजेश जोशी यांची ‘पागल लडकी,’ उदय प्रकाश यांची ‘सूँवर...’  अशी प्रत्येक कविता खडबडून जागे करणारी होती. प्रत्येक कवितेनंतर त्या कवितेचे वर्ष सांगून आजच्या काळातही या कविता कशा समकालीन वाटतात, याचे विश्लेषण गणेश विसपुते यांनी केले.

कार्यक्रमाच्या समारोपाला ज्येष्ठ कवियित्री व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षा नीरजा यांनी असे कार्यक्रम जास्तीत जास्त तरुणांसमोर केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाने हिंदी कविता जगतातील समकालीन भासणाऱ्या व प्रत्येकाला विचार करण्यास लावणाऱ्या कवितांचे जग उलगडून दाखवले. 

(या काव्यमैफलीतील काही कविता पाहा सोबतच्या व्हिडिओत...)
(शब्दांकन व व्हिडिओ : यशश्री पुरोहित)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link