Next
‘पुणे श्री २०१९’चे आयोजन
BOI
Tuesday, February 12, 2019 | 04:42 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील ‘द हिंदू फाउंडेशन’ आणि नगरसेवक धनंजय जाधव मित्र परिवार यांच्या वतीने तसेच ‘पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटने’च्या मान्यतेने पुणे जिल्ह्याच्या मानाच्या ‘पुणे श्री २०१९’ या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता लोकमान्य नगर येथील जॉगिंग पार्क याठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. 

‘पुणे श्री २०१९’बरोबरच ‘गिरीशभाऊ बापट श्री २०१९’, ‘द हिंदू श्री २०१९’ या स्पर्धादेखील आयोजित करण्यात आल्या आहेत. मागील सलग ११ वर्षांपासून ‘पुणे श्री’ ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा ५५, ६०, ७०, ७५, ८० व ८०किलोवरील अशा एकूण सात वजनी गटांत होईल. यंदा स्पर्धेत तीन कितांबांसाठी लढत होईल. एकूण पाच लाख रुपयांची रोख बक्षीसे तसेच प्रत्येक सहभागी खेळाडूला टी-शर्ट देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त विजेत्यास रोख बक्षीसासह अप्पर ट्रॅक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. यंदा प्रथमच टायटल, गटातील आणि आणि इतर सर्व विजेत्यांना एकूण पाच लाख रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत. आशिया किरण पाटील यांची बॉडी बिल्डिंगची प्रात्यक्षिके हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे. 

स्पर्धेचे मुख्य बक्षीस वितरण पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी खासदार, आमदार, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link