Next
महाराष्ट्र, राजस्थानात कृत्रिम शेततळ्यातून २०० अब्ज लिटर्स पाण्याची बचत
‘अवाना’च्या माध्यमातून २२ वर्षीय मैथिली अप्पलवारचे प्रयत्न
BOI
Thursday, July 25, 2019 | 01:19 PM
15 0 0
Share this article:

शेतकऱ्यांसमवेत मैथिली अप्पलवार

मुंबई : महाराष्ट्र व राजस्थानमधील विविध जिल्ह्यांमध्ये जलसंवर्धनाच्या साध्यासोप्या पद्धतींचा अवलंब करून २०० अब्ज लिटरपेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन करण्यात आले आहे. यामुळे आता शेकडो शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना उपजीविकेचे अधिक चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत.  ‘अवाना’च्या सीईओ मैथिली अप्पलवार यांनी गरजूंच्या मदतीसाठी जल संवर्धनाच्या अनोख्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब करत ही पाण्याची बचत केली. 

एम्बी इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक स्ट्रॅटेजिक बिजनेस युनिट ‘अवाना’च्या संस्थापक मैथिली अप्पलवार यांनी भारतातील शेतकऱ्यांना भूक व गरिबी या संकटांमधून बाहेर काढण्यासाठी परवडण्याजोगे उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. जलसंचय, ‘अवाना’चे प्रमुख उत्पादन, जगातील सर्वात जास्त किफायतशीर, सर्वसमावेशक जल संवर्धन उपाययोजना आहे. जलसंचय ही अतिशय सहजसोपी आणि तरीही अतिशय उत्तम व प्रभावी संकल्पना आहे. यामध्ये शेतात एक मोठा खड्डा खोदला जातो व त्यावर एक पॉलिमर अस्तर घातले जाते. खड्ड्याचे अशाप्रकारे अस्तरीकरण झाल्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरून जात नाही. अशा प्रकारे हे एक कृत्रिम शेततळे तयार होते.  ज्यात पावसाचे पाणी, नदीमधून वाहून येणारे अतिरिक्त पाणी जमा करून ठेवले जाते. जलसंचयसाठी दरवर्षी एक पैसा प्रति लिटर या दराने खर्च येतो. ही रक्कम पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या याच आकाराच्या काँक्रीट टॅंकच्या खर्चाच्या फक्त १/१० भागाइतकीच आहे. म्हणूनच अगदी गरीब शेतकरीदेखील याचा लाभ घेऊ शकतात. या उपाययोजनेत पुढे वाढविण्याची अत्याधिक क्षमता आहे. तीन वर्षांहूनही कमी काळात ‘अवाना’ने पाच हजार शेतकऱ्यांसोबत भागीदारीमध्ये २०० अब्ज लिटर पाण्याची बचत केली आहे.

महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, बुलढाणा, धुळे, वाशिम, हिंगोली आणि नाशिक तसेच राजस्थानातील जैसलमेर, बीकानेर, चुरु, श्रीगंगानगर, हनुमानगढ, नागौर आणि भीलवाडा या ठिकाणी मिळून २०० अब्ज लिटर पाण्याचे यशस्वीपणे संवर्धन करण्यात आले आहे.

मैथिली अप्पलवारया विषयी बोलताना मैथिली म्हणाल्या, ‘कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्याची क्षमता असलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना मला प्रभावित करतात. प्रत्येकवेळी नवीन तंत्रज्ञानासाठी खूप मोठी गुंतवणूक करणे आवश्यक नसते, हे समजून घेणे गरजेचे आहे. गंभीर समस्या सर्वांत प्रभावी पद्धतीने सोडविल्या जाणे गरजेचे आहे. ‘अवाना’मध्ये आम्ही नेहमीच परवडण्याजोग्या खर्चात सहजसोप्या उपाययोजना देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या उपाययोजनांमध्ये सामाजिक परिवर्तन सगळ्यात महत्त्वाचे आहे, जे समाजात मोठ्या प्रमाणात घडवून आणले जाऊ शकते.’

‘सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची युवा पिढीतील शक्ती मला नेहमीच प्रभावित करते. भारतातील शेतकऱ्यांना सबळ व समृद्ध करणे हे माझे स्वप्न आहे. मला वाटते की, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी युवा, उत्साही लोकांनी मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे,’ असे मैथिली यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांनी पाण्याची बचत, संवर्धन आणि पाण्याच्या भूस्तरामध्ये पुन्हा पुन्हा भर घालत राहणे आवश्यक आहे. कारण त्यांची उपजीविका सर्वांत जास्त पाण्यावर अवलंबून आहे; परंतु काँक्रीट टँकसारख्या पारंपरिक जल संवर्धन उपाययोजना वापरणे हे बहुसंख्य भारतीय शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. या समस्येवर तोडगा सुचवण्यासाठी अनेक स्टार्ट-अप्स व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. यात २२ वर्षीय मैथिली अप्पलवारदेखील होत्या. जल संसाधन मंत्रालयाने नुकत्याच आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये त्यांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमातील त्या सर्वांत कमी वयाच्या वक्त्या होत्या. टेक्निकल टेक्स्टाइल्सचा उपयोग कशा प्रकारे केल्यास भारतातील शेतीसाठी सहजसोप्या, पुढे वाढवता येण्याजोग्या उपाययोजना बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 26 Days ago
Should this activity be extended to taluka places ? Is it not in the interest of the local politicians to take up the matter ? After all , the activity can be a vote - winner .
0
0

Select Language
Share Link
 
Search