Next
पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास
BOI
Tuesday, July 17, 2018 | 09:40 AM
15 0 0
Share this story

दर वर्षी निघणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांकृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. तसाच तो वारकरी संप्रदायाचाही एक भाग आहे. पंढरपूरला जाणारी आषाढी वारी हा केवळ राज्याचा नव्हे, तर देश-विदेशातील नागरिकांच्या आदराचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. नीता अंकुश टेंगले यांनी आषाढी वारीचा सर्व बाजूने अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडला आहे.

‘वारीची पार्श्वभूमी’ या प्रकरणात भक्ती, मार्ग, भागवत संप्रदाय यांचे विवेचन आले आहे. त्यानंतरच्या प्रकरणात ऐतिहासिक मागोवा घेतला आहे. ‘वारीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व’ या प्रकरणात अभंग, कीर्तन, भारुड, लोककला आदींवर प्रकाश टाकला आहे. ‘वारीमार्गातील समस्या’ या प्रकरणात सार्वजनिक स्वच्छता, चंद्रभागा नदीचे प्रदूषण, वारकऱ्यांना वारी काळात येणाऱ्या समस्या आदींचा अभ्यास आहे.

प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स
पाने : १५२
किंमत : २८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link