Next
‘मोबाइलवर गेम्स खेळण्यापेक्षा मैदानात खेळावे’
‘परशुरामपमंत अभ्यंकर’च्या स्नेहसंमेलनात विजया टिकेकर यांचे आवाहन
BOI
Friday, December 28, 2018 | 03:37 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी : ‘विद्यार्थ्यांनी भरपूर वाचावे, अभ्यास करावा. खेळ म्हणजेसुद्धा अभ्यासच असतो. मोबाइलवर गेम्स खेळण्यापेक्षा मैदानात खेळावे. मोठे झालात, तरी शाळेला विसरू नका. विद्यार्थ्यांनी मोठे होऊन नि:स्वार्थीपणे समाजसेवा करावी,’ असे आवाहन माजी मुख्याध्यापिका विजया टिकेकर यांनी केले.

परशुरामपमंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरच्या शालेय दिनानिमित्त शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी सीए अक्षय जोशी, दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुमिता भावे, वैदेही अभ्यंकर, शाळा व्यवस्थापक दिलीप भातडे, मुख्याध्यापक विनोद नारकर, उपमुख्याध्यापक प्रकाश कदम उपस्थित होते. या प्रसंगी सीए जोशी यांचा सत्कार करण्यात आला. वाचनाची गोडी लागावी म्हणून टिकेकर यांनी शाळेला देणगी दिली; तसेच शाळेच्या अहवालाचे प्रकाशन केले.सीए जोशी यांनी मीसुद्धा लहानपणी शाळेत बक्षीसे मिळवली, कार्यक्रमात भाग घेतला आणि आज प्रमुख पाहुणा म्हणून येऊ शकलो याबद्दल शाळेचे ऋण व्यक्त केले; तसेच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची गोष्ट सांगून छोटा भीम पाहता तशी ताकदसुद्धा आपल्यात यावी म्हणून दररोज खेळण्याचे आवाहन केले.अ‍ॅड. भावे यांनी पालकांचे नेहमीच शाळेला सहकार्य मिळते, असे सांगितले. टीव्हीवरील मालिकांमुळे लहान मुलांच्या कानावर नको ते विषय पडत असल्याने पालकांनी मुलांसमोर टीव्ही पाहू नये, अशी सूचना करून आम्हीसुद्धा वर्षभर मालिका पाहत नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ‘दोन वर्षांनी संस्थेचा शतक महोत्सव आहे. आज रत्नागिरीतील प्रत्येक क्षेत्रात पहिल्या पाच व्यक्तींमध्ये शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याबद्दल अभिमान वाटतो. शाळेचा दर्जा ठरवणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी व आठवीमध्ये होते; पण आपल्या प्राथमिक शाळेत चौथीपासूनच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन. तसेच उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना पाठांतराचा अभ्यास दिला जातो. त्याचाही फायदा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळा, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या समन्वयातूनच संस्था पुढे जात आहे,’ असे भावे यांनी सांगितले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराज, कोळी नृत्य, जोगवा, श्रीकृष्णाच्या जीवनावरील नृत्य आदी नृत्ये रंगतदार झाली. महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारी ही नृत्ये सार्‍यांना आवडली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व पालक प्रतिनिधींचे सहकार्य लाभले. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link