Next
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन
प्रेस रिलीज
Tuesday, January 09, 2018 | 12:57 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. आझम कॅम्पस येथे आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी ‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला, मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख उपस्थित होत्या.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमांमध्ये काव्य वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नाटक स्पर्धा, मराठी चित्रपट शो, महाराष्ट्रीयन खाद्य मेळावा, मराठी लेखक आणि कवी भित्तीपत्रक स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search