Next
पंतप्रधान आवास योजनेमधील १२१५ घरकुलांना मंजुरी
हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांची माहिती
नागेश शिंदे
Thursday, October 04, 2018 | 12:37 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : हिमायतनगर नगरपंचायतीअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेमधील १२१५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी ७० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे शहरात नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून प्रतीक्षेत असलेल्यांना दिवाळीची भेट मिळाली आहे.

आमदार नागेश पाटील-आष्टीकर व खासदार राजीव सातव यांनी ही मंजुरी मिळण्यासाठी राज्य आणि केंद्र स्तरावर खूप प्रयत्न केले. तीन ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. केवळ मंजुरीच नव्हे, तर या योजनेसाठी ७० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत जास्त घरकुले मंजूर झाली आहेत, असे राठोड यांनी सांगितले. ‘आमदार आणि खासदार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आम्ही सत्तेत आलो तेव्हापासून या योजनेच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला,’ असे राठोड म्हणाले. उपनगराध्यक्ष मो. जावेद हा. अ. गनी यांच्यासह सहकारी  नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली येत्या दिवाळीपूर्वी कामास सुरुवात होणार असल्याची माहिती राठोड यांनी दिली.

हिमायतनगर शहरात एकूण १२१५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यात केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून दोन लाख ५० हजार रुपये प्रति लाभार्थी मिळणार आहेत. हिमायतनगर शहरातील कोणत्याही वॉर्डातील वंचित नागरिकाकडून या योजनेचा फॉर्म भरायचा राहून गेला असेल, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपनगराध्यक्षांनी केले. या वेळी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, रामभाऊ ठाकरे, अन्वर खान पठाण, सदाशिव सातव, जनसेवक सरदार खान, सावन डाके, विनायक मेंडके, अ. गुफरान भाई आदींसह मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search