Next
कथ्थक नृत्य परीक्षेत रत्नागिरीची पूर्वा जोगळेकर प्रथम
भरतनाट्यम नृत्यप्रकारात मीरा खालगावकर द्वितीय
BOI
Monday, November 26, 2018 | 03:20 PM
15 0 0
Share this article:

पूर्वा जोगळेकररत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पटवर्धन संगीत अकादमीत गेली चार वर्षे पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील नृत्य विभागामार्फत परीक्षा घेतल्या जातात. यात कथ्थक नृत्य प्रकारात पूर्वा जोगळेकर हिने प्रथम, तर भरतनाट्यम प्रकारात मीरा खालगावकरने द्वितीय क्रमांक पटकावला.  

या परीक्षेत दोन्ही विभागाच्या मिळून ४५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यशवंतराव पटवर्धन अकादमीच्या प्रमुख रूपाली लिमये यांच्याकडे गेली सात वर्षे कथ्थक नृत्याचे धडे घेणारी विद्यार्थिनी पूर्वा जोगळेकर कथ्थक नृत्यप्रकारात मध्ये केंद्रात प्रथम आली.

मीरा खालगावकरअकादमीच्या भरतनाट्यम् विभागप्रमुख मिताली भिडे यांच्या साईश्री नृत्य कलामंदिरात गेली चौदा वर्षे भरतनाट्यमचे नृत्यशैलीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मीरा खालगावकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. पुणे नृत्य विभागातून यशस्वी झालेल्या या दोन्ही नृत्यांगनांचे अकादमीने अभिनंदन केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search