Next
मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’
प्रेस रिलीज
Saturday, December 09, 2017 | 01:27 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ या सौंदर्य स्पर्धेचा दुसरा सिजन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. उंची, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गुण या निकषांवर मंजूषा मुळीक यांनी ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ चा किताब पटकावला.

या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून २५० सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यातील २० स्पर्धक अंतिम फेरीत पोहचल्या. यांतून मुळीक यांना ‘मिसेस महाराष्ट्र’ ही उपाधी मिळाली. इचलकरंजीच्या सौम्या पवार आणि पिंपरी-चिंचवडच्या अंजली चिंचवाडे अनुक्रमे फस्ट आणि सेंकड रनर अप बनल्या. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या. स्पर्धेसाठी रेश्मा सराफ यांनी कपडे डिजाईन केले होते, तर मेकअप सिम्ज यूनीसेक्स सॅलोनचा होता.

या प्रसंगी विचार व्यक्त करताना मुळीक म्हणाल्या, ‘मी खरोखरच आनंदी आहे की हे स्वप्न सत्यात उतरले आहे. माझे पालक, बहिण, मित्र आणि शुभचिंतकांच्या बिनशर्त प्रेम आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते.’
 
स्पर्धेला परीक्षक म्हणून ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल ग्रुमर’ हेमा कोतनिस, लाइफस्टाइल मॅगझिनच्या निशरीन पूनवाला, ‘मिसेस एशिया’ प्रियंका पोल, ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’ स्नेहा प्रहलादका उपस्थित होत्या. जॅझमाटाझ वर्ल्ड गत २५ वर्षांपासून याचे प्रायोजक आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search