Next
‘फ्रीडम फ्रॉम डायबेटीस’तर्फे मुक्तोत्सवाचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, September 27, 2018 | 03:22 PM
15 0 0
Share this article:

‘मुक्तोत्सव २०१८ची माहिती देताना डॉ. प्रमोद त्रिपाठी. शेजारी डॉ. स्मिता इनामदार.पुणे : फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशनतर्फे मधुमेहींसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘मुक्तोत्सव २०१८’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन २९ सप्टेंबर २०१८ रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी पाच ते आठ या वेळेत होईल. या वेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

जे मधुमेही अवघड अशी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (जीटीटी) पास झाले आहेत, अशांचा मुक्तोत्सवात सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमात डॉ. प्रमोद त्रिपाठी मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शन करणार असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे.

याबरोबरच कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांच्यातर्फे विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. ‘मधुमेहींसाठी खास डायबेटीक फ्रेंडली सूप्स, सॅलडस, चटणी अ‍ॅंड डीप्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. क्लॅप जॅम आणि ड्रम सर्कल हा मनोरंजनाचा कार्यक्रम देखील प्रेक्षकांसाठी असणार आहे.

फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे औचित्य साधून फ्री फ्रीडम फ्रॉम डायबेटीस हे मधुमेहींसाठी विकसित केलेल्या अ‍ॅपचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले जाणार आहे.

याबाबत बोलताना फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. त्रिपाठी म्हणाले, ‘फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशन ही संपूर्ण परिवर्तनाचा अनुभव निर्माण करणारी संस्था असून, ती मधुमेहींना इन्सुलिन आणि औषधांपासून नैसर्गिकरीत्या मुक्त होण्यासाठी प्रशिक्षिण, प्रेरणा आणि सहाय्यता देते. जे मधुमेही व त्यांच्या कुटुंबातील सदस्य या संस्थेच्या संपर्कात येतात, त्यांच्या आहार, व्यायाम, तणाव नियंत्रण व सकारात्मकतेत अमुलाग्र बदल घडतो. एकंदर अनुभव इतका सक्षम असतो की, बरेच मधुमेही औषधे व इन्सुलिनपासून मुक्त व्हायला लागतात. विलक्षण व अत्यंत फायदेशीर परिणाम व सर्वांच्या सदिच्छेने आता ही एक सामाजिक चळवळ बनली आहे.’

‘मुक्तोत्सवचे मुख्य उद्देश्य फ्रीडम फ्रॉम डायबेटीस कार्यक्रमामार्फत ज्या मधुमेहींनी जीटीटी टेस्ट पास केली आहे त्यांचे यश साजरे करणे आहे व इतर मधुमेहींना यासाठी प्रेरित करणे आहे. भारतात मधुमेहाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे; पण तरीही यावर मात करणे शक्य आहे आणि हेच आम्हांला या कार्यक्रमामार्फत दाखवायचे आहे,’ असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.

डॉ. त्रिपाठी यांनी २०११मध्ये फ्रिडम फ्रॉम डायबेटीस हा अभिनव कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाद्वारे साडेपाच हजारांहून अधिक लोकांची मधुमेहासाठीच्या औषधांपासून आणि एक हजार लोकांची इन्सुलिनपासून मुक्तता झाली आहे.

‘मुक्तोत्सवाविषयी :
दिवस :
शनिवार, २९ सप्टेंबर २०१८
वेळ : सायंकाळी पाच ते आठ
स्थळ : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.
नोंदणीसाठी संपर्क : ७७७६० ७७७६०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search