Next
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर
BOI
Thursday, June 07, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..... 

मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष

सात जून १९१३ रोजी दादरमध्ये जन्मलेले डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे ज्येष्ठ समीक्षक आणि ललित लेखक म्हणून ओळखले जातात. ‘पुरुषराज अळुरपांडे’ असं काहीसं विक्षिप्त नाव घेऊन काही लेख बडोद्याच्या अभिरुची मासिकांत येत असत. गंमत म्हणजे ते नाव घेऊन लिहिणारी एक व्यक्ती नसून तीन जण होते. ते म्हणजे - पु. ल. देशपांडे, रा. वा. अलूरकर आणि मं. वि. राजाध्यक्ष! साहित्य, संगीत, नाटक अशा आवडत्या विषयांवर तिघांच्या आपसांतल्या गप्पांमधून जन्म घेणारे हे लेख त्या काळी लोकांना भारीच पसंत पडले होते. 

राजाध्यक्ष यांनी रत्नाकर, संजीवनी, चित्रा, प्रतिभा, ज्योत्स्ना, समीक्षक अशा मासिकांमधून वेगवेगळ्या नावांनी लेख लिहायला सुरुवात केली होती. शमा आणि निषाद यांचं ‘वाद-संवाद’ हे सदर लोकप्रिय होतं. त्यातले शमा होते द. ग. गोडसे आणि निषाद होते राजाध्यक्ष! हे खुमासदार आणि लज्जतदार सदर अनेक वर्षं चाललं होतं. 
त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली, बॉम्बे गॅझेटियरसाठी इंग्लिशमधूनही भरपूर लेखन केलं. 

मनमोकळे, निवडलेले खर्डे, शालजोडी, वाद-संवाद, पाच कवी, खर्डेघाशी, आकाशभाषिके, अमलान, पंचम, पाक्षिकी, शब्दयात्रा - अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

ज्ञानपीठ पुरस्कार समिती आणि साहित्य अकादमीचे ते अनेक वर्षं सदस्य होते. 

१९ एप्रिल २०१० रोजी त्यांचं निधन झालं.

(मं. वि. राजाध्यक्ष यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.....

सुमती हरिश्चंद्र पायगावकर 

सात जून १९१० रोजी जन्मलेल्या सुमती हरिश्चंद्र पायगावकर या बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या १९७६ साली सोलापूरमध्ये भरलेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.

पतंग, चेंडू नि शिपला, फेनाली, अरेबियन नाइट्स, चंद्रफुले, एका पांघरुणाची गोष्ट, हॅन्स अॅन्डरसनच्या परीकथा, जिमी, लालझंडी छोटी नीरा, छोटा लाल बूट, किलबिल, गंमतीदार किटली, अलिबाबाची गुहा, पोपटदादाचे लग्न, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे.  

सहा मे १९९५ रोजी त्यांचं निधन झालं.

(सुमती पायगावकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link