Next
बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ
BOI
Wednesday, April 19, 2017 | 04:56 PM
15 6 0
Share this article:

ठाणे : महिला बचत गट, महिला संस्था यांनी बनवलेल्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, इतर महिलांना त्यांच्या वेळेनुसार व्यवसाय चालू करून देणे असा वसा  ‘माझा महाराष्ट्र’चे संस्थापक दीपक विठ्ठल काळीद यांनी घेतला आहे. 
महिला बचत गट ही संकल्पना २००५च्या आसपास सुरू झाली. त्यांचा उद्देश होता महिलांना आर्थिक स्वातंत्र मिळण्यासाठी व्यवसायात कार्यरत करणे. परंतु काही अपवाद वगळता हा उद्देश सफल झाला नाही. त्याचे मुख्य कारण बचत गटाचे अनुदान, कर्ज यातून बाहेर पडून व्यवसाय करण्याची मानसिकता तयार होत नाही. 
महिला उद्योजकता याचा विचार हल्ली सुरू झाला असला, तरी अगदी पूर्वीपासून घरातील महिला उद्योग करून कुटुंबाला हातभार लावत आल्या आहेत. २० वर्षांपूर्वी गावाकडे प्रत्येक घरात कोंबडीपालन, शेळीपालन, गायी-म्हशींचे पालन केले जात होते. तसेच उन्हाळयात पापड, लोणची, शेवया, कुरडया, पापड्या यांचे उत्पादन केले जायचे. शेतातील बांधावर घरी लागणाऱ्या भाज्या, मिरच्या आदींची लागवड केली जात असे. मुंबईतील गिरण्यांचा काळ लक्षात घेतला, तर त्या वेळी तेथील महिला खाणावळ चालवत असत. 
बचत गटाच्या स्थापनेनंतर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरुवात झाली. महिलांनी काही वस्तू, पदार्थ बनवण्यास सुरुवात केली तर काही अडचणी येऊ लागल्या. पुरेसे भांडवल उपलब्ध होत नव्हते. बनवलेल्या मालाची किंमत बाहेर विकत मिळणाऱ्या मालाच्या किमतीपेक्षा जास्त होते. तसेच बनवलेला माल विकायचा कुठे आणि कसा, असे प्रश्न निर्माण झाले होते. दीपक काळीद
या पार्श्वभूमीवर, ‘माझा महाराष्ट्र’चा पहिला महिला मेळावा २००० साली भांडुप येथे घेण्यात आला होता. त्यामध्ये अनेक प्रश्न समोर आले होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन आम्ही या महिलांना मदत करण्यास तयार आहोत, असे दीपक काळीद यांनी म्हटले आहे. 
खाद्यपदार्थ, मसाले, लोणची, पापड, चटण्या, बांबूची खेळणी, वस्तू, झाडू, सॉफ्ट खेळणी, इतर शोभेच्या वस्तू, गाउन, परकर, गोधड्या, आंबा, फणसाचे पदार्थ, सरबत, मांडे, कुरडया, पापड्या, सांडगे, पुरणपोळी, दागिने, चटण्या, बडीशेप, हस्तकलेच्या वस्तू, पेन्टिंग, चॉकलेट, लाडू, चकल्या, शेव, शेवया यापैकी कुठल्याही प्रकारची उत्पादने महिला बनवत असतील, तर आम्ही आपणास बाजारपेठ नक्कीच मिळवून देऊ,असे काळीद यांनी म्हटले आहे.
बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उपलब्ध पर्याय : 
-ई-कॉमर्स साइटवर ऑनलाइन विक्री (www.majhamaharashtra.in)
-इंडिया मार्टद्वारे घाऊक विक्री
-डी मार्ट, बिग बास्केट, बिग बाजार,  मेट्रो मॉल,  अपना बाजार या मॉलमध्ये विक्री
‘तुमच्या नावाने नोंदणी करून आमच्या डिस्ट्रिब्युशन नेटवर्कमधून संपूर्ण महाराष्ट्रात  मालाला मागणी येण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रदर्शन आणि विक्री महाराष्ट्रात आणि देशभरात आयोजित केले जातील. तसेच आम्ही या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, जनसंपर्क असणाऱ्या महिलांना कार्यकारिणी सदस्य बनवू इच्छित आहोत. त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा,’ असे आवाहन दीपक काळीद यांनी केले आहे.
संपर्क : ९८२०३ १७१५० (दीपक काळीद, संस्थापक), ९८९२० ८५९२८ (तरुणा कुंभार, संचालिका)

 
15 6 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pappu zende About 25 Days ago
मला मसाल्याचा व्यवसाय सूरु करायचा आहे मार्गदर्शन करावे
0
0
Laxmi malhari mane About 110 Days ago
Amhala bacht gatasathi market pahije
0
0
Laxmi Malhari Mane About 220 Days ago
Aamhala kamachi khup garaj aahe please help Kara aamhi Gomewadit bacht gat chalvto aamchi kam kraychi khup echa aahe aani garj pn aahe 10. 20 rupya sathi aamala khup man marun jgave lagte pn aamhala kame nahit aani kahi kryche mhanle tr khede gav aslya mule Market pn nahi please help us
3
0
Anuradha lodhi About
Very good project sir mala tumcha barobar kam karayala avdel (ngo) ahe amchi 75 bachat gat ahet
0
0
c.v lalita About
Mi paper pleat banavat aahe .tar mazhya malasathi bajarpeth uplabadh hoil ka?
0
1

Select Language
Share Link
 
Search