Next
प्रदीप स्वीट्स, इस्माईल बेकरी ‘कामानी बेकरी चॅलेंज’चे विजेते
BOI
Tuesday, October 30, 2018 | 03:53 PM
15 0 0
Share this story

कामानी बेकरी चॅलेंज स्पर्धेत कामानी कंपनीचे उपाध्यक्ष अरुण वर्मा यांच्या हस्ते आरोग्य श्रेणीतील विजेतेपद स्वीकारताना प्रदीप स्वीट्सचे    निखील बंसल आणि सहकारी.

पुणे : भारतातील आघाडीच्या स्पेशालिटी ऑईल अँड फॅटस् उत्पादक असणाऱ्या एएके कामानी प्रा. लि. कंपनीने पुण्यामध्ये ‘कामानी बेकरी चॅलेंज २०१८’ स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. या स्पर्धेत शहरातील आघाडीच्या बेकरी सहभागी झाल्या होत्या. या वर्षी स्पर्धेत प्रदीप स्वीट्सने आरोग्य श्रेणीतील विजेतेपद मिळवले. रोलॅक्स बेकरीला दुसऱ्या क्रमांकाचा,तर श्री न्यू मॉडर्न बेकरीला शेफ्ज चॉईस पुरस्कार देण्यात आला. इस्माईल बेकरीने इनोव्हेशन श्रेणीमध्ये विजेतेपद मिळवले. या श्रेणीतील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस न्यू क्राउन बेकरीला, तर श्री हनुमान परफेक्ट बेकरीला शेफ्ज चॉईस पुरस्कार देण्यात आला.

या वेळी एएके कामानी कंपनीच्या सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष अरुण वर्मा म्हणाले,‘एएके कामानी पुण्यातील बाजारपेठेशी अनेक वर्षांपासून संलग्न आहे. आता आम्ही ग्राहकांना अधिकाधिक आरोग्यदायी पदार्थ देण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. बेकरी उत्पादनांची पुण्यातील बाजारपेठ नेहमीच कौशल्य आणि क्षमता दाखवून देत असते. आमच्या उपक्रमाला पुण्यातील बेकरी कम्युनिटीने दाखवलेला उत्स्फुर्त प्रतिसाद आनंददायी आहे.’

आरोग्य श्रेणीतील विजेतेपदाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रदीप स्वीट्सचे निखील बंसल म्हणाले,‘ या स्पर्धेतील यशाने आम्ही अतिशय उत्साहीत झालो आहोत. एएके कामानी कंपनी आम्हाला नेहमीच आरोग्यदायी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहीत करते.आमचे कौशल्य दाखवण्यासाठी उत्कृष्ट प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्दल एएके कामानीच्या संपूर्ण टीमचे आम्ही आभारी आहोत.’

कामानी बेकरी चॅलेंज स्पर्धेत कामानी कंपनीचे उपाध्यक्ष अरुण वर्मा यांच्या हस्ते  इनोव्हेशन श्रेणीमध्ये विजेतेपद स्वीकारताना इस्माईल बेकरीचे मुसा शमीम अन्सारी व अन्य मान्यवर.

इनोव्हेशन श्रेणीत विजेतेपद मिळवणाऱ्या इस्माईल बेकरीचे मुसा शमीम अन्सारी म्हणाले,‘या वर्षी कामानी बेकरी चॅलेंजमध्ये सहभागी होउन विजेतेपद मिळवणे हा अतिशय चांगला अनुभव ठरला.एएके कामानी कंपनीसोबत काम करणे हा आमच्या व्यवसाय विकास, इनोव्हेशन आणि फूड डेव्हलपमेंटसाठीही महत्वाचे असते.’

या स्पर्धेचे परिक्षक म्हणून शेफ पराग कंदारकर, क्राउन प्लाझाचे शेफ अलोक सिंग आणि जेडब्ल्यू मेरियटचे शेफ जोगिंदर सिंग यांनी काम पाहिले. 

कोल्हापूर, अहमदाबाद आणि पुणे येथे झालेल्या ‘कामानी बेकरी चॅलेंज’चे विजेते नोव्हेंबरमध्ये मुंबईत आयोजित ‘फेस ऑफ’मध्ये आमनेसामने येतील.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link