Next
‘राइज’च्या रोजगार मेळाव्यात होणार हजारहून अधिक उमेदवारांची भरती
प्रेस रिलीज
Monday, April 29, 2019 | 11:48 AM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘एपीजी लर्निंग’ या पुणे स्थित कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतर्फे ‘राइज’ हा महारोजगार मेळावा तीन आणि चार मे २०१९ रोजी भारती विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड एन्ट्रेप्रिनरशिप संस्था येथे आयोजित केला आहे. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रांत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुसंधी आहे. या महामेळाव्यात ३० हून अधिक बीएसएफआय कंपन्या एक हजारहून अधिक उमेदवारांची भरती करणार आहेत.

कंपन्या आणि कर्मचारी यांना कर्मचारी भरतीसंदर्भात वाढत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एपीजी लर्निंग या पुणे स्थित कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेने राइज हा महारोजगार मेळावा भरवण्याचे ठरवले. या दोन दिवसांच्या रोजगार मेळाव्यात बीएफएसआय क्षेत्रात काम करणाऱ्या ३० हून अधिक कंपन्या पुण्यात एक हजाराहून अधिक तरुणांची भरती करणार असून, काही पदे पुणे शहराबाहेरूनही भरली जातील. बजाज अलायन्स, रिलायंस लाइफ इन्श्युरन्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, अल्टम क्रेडो होम फिनान्स, पीएनबी मेटलाइफ इंडिया इंश्युरंस, एमस्वाइप आणि एक्सपिरीस अशा काही कंपन्या आगामी रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत. एपीजी लर्निंग वेबसाइटवर कामाच्या स्वरूपाचा उल्लेख केला आहे. उमेदवार पदवीधर, पदव्युत्तर किंवा एमबीए पदवीधारक असला पाहिजे. सीए इंटर उमेदवारही अर्ज करू शकतात.    

मेळाव्याच्या तारखा विद्यार्थ्यांचे सोयीचे दिवस पाहून ठरवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थी परीक्षा झाल्यावर लगेचच मुलाखतींना उपस्थित राहू शकतील आणि नंतर सुट्टीवर जाऊ शकतील. एपीजी लर्निंग कौशल्य प्रदान करून शाश्वत सामाजिक-आर्थिक विकास करण्यावर लक्ष केंद्रित करत असून, विद्यार्थी आणि रोजगार देणाऱ्या कंपन्या यांना सहभाग नि:शुल्क ठेवला आहे. उमेदवारांनी मेळाव्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना एक ओळखपत्र दिले जाईल ते त्यांनी मेळाव्याला बरोबर आणायचे आहे.

‘एपीजी लर्निंग’चे सीईओ विकास सिंग म्हणाले, ‘भारतातील रोजगाराचे चित्र मोठ्या आव्हानांना सामोरे जात आहे कारण कंपन्यांना योग्य बुद्धिमत्ता शोधून काढणे आणि उमेदवारांना योग्य नोकरीच्या संधीची माहिती मिळवणे कठीण जात आहे. एपीजी लर्निंग कंपन्या आणि नोकरी मिळवू इच्छिणारे यांना ‘राइज’ या विशेष मेळाव्यात एकत्र आणू पाहत असून, त्याच वेळी दोघांनाही बहुपर्याय देऊ करत आहे आणि अशा तऱ्हेने वेळ, प्रयत्न, आणि प्रक्रियेवरील खर्च कमी करत आहे.’

‘रोजगार क्षेत्रातील अवघड स्थिती सुलभ करण्यासाठी तसेच योग्य कामासाठी योग्य व्यक्ती मिळवून देण्याच्या दृष्टीने एपीजी लर्निंगची राईज ही कटीबद्धता आहे. राईजचे असेच अनेक मेळावे इतर क्षेत्रातही कर्मचारी भरतीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी होतील,’ असेही सिंग यांनी सांगितले. 

नोंदणीसाठी वेबसाइट : https://www.apglearning.in/job-fair/ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search