Next
‘सध्याचे मध्यपूर्व म्हणजे अरब जग नव्हे’
प्रा. अशर सुसेर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Wednesday, May 08, 2019 | 12:59 PM
15 0 0
Share this article:

कार्यक्रमात बोलताना प्रा. अशर सुसेर

पुणे : ‘मध्यपूर्व देश म्हणून अरब देशांकडे बघितले जात असे; परंतु आता ती व्याख्या बदलत आहे. अरब देशांतील राजकीय स्वातंत्र्य, अद्ययावत शिक्षणाची कमतरता व लिंग भेदाचे वाढते प्रमाण यामुळे अरब देशांची पिछेहाट झाली आहे,’ असे मत इस्राइल येथील तेल अवीव विद्यापीठात मध्यपूर्व इतिहासाचे अभ्यासक प्रा. अशर सुसेर यांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर, कॉन्फिडरेशन ऑफ इंडिअन इंडस्ट्रीज (सीआयआय), अनंता अस्पेन सेंटर यांच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयए येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. सुसेर बोलत होते. ‘इस्राइल, इराण आणि अरब– २१व्या शतकातील मध्यपूर्व’ या विषयावर यावेळी त्यांनी आपली मते मांडली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चीनमधील भारताचे माजी राजदूत आणि पाकिस्तानचे माजी भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांनी भूषवले. या वेळी अनंता अस्पेन सेंटरचे कार्यकारी संचालक सुजित हरिदास, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे मानद संचालक प्रशांत गिरबने व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. सुसेर म्हणाले, ‘अरब देशांचे वर्तमान आणि भविष्य समजून घेण्यासाठी १५ वर्षे मागे जाण्याची आवश्यकता आहे. त्यावरून ते काय आणि का आहेत याचा आढावा आपण घेऊ शकू. तेथे शिक्षण आणि रोजगाराची कमतरता असून लोकसंख्या जास्त आहे. येथे महिलांना घराबाहेर जाऊन काम करण्याची फारशी परवानगी नाही याबरोबरच एवढ्या मोठ्या लोकसंख्येने त्यांच्या आर्थिकस्थितीवर खूप मोठा परिणामदेखील होत आहे. याच कारणाने अरब देशांमध्ये आपत्तीजन्य परिस्थिती आहे. भविष्यातदेखील यामुळे पाण्याचीही मोठी समस्या भेडसावणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.’

‘अरब देशांमध्ये आपापल्या भाषा बोलून आपली वेगळी ओळख दाखविण्याची पद्धत नाही. यांची ओळख म्हणजे केवळ त्यांचा धर्म म्हणजे इस्लाम हीच आहे. त्यांना मध्यपूर्व देश म्हणणे ही युरोपियन संकल्पना (फॅड) आहे. येथे इस्लाम हा एकच धर्म असून, त्यात सिया आणि सुन्नी यांच्यातील विकोपाला गेलेले वाद आहेत. इराकमध्ये सिया लोक मोठ्या संख्येने असले, तरी सत्ता मात्र सुन्नी लोकांकडे होती. सद्दाम हुसेनचा प्रयत्न ही सत्ता सुन्नी लोकांकडून काढून ती सियांना देण्याचा होता. त्यातूनच त्याला इराकच्या बाहेर काढण्यात आले,’ अशी माहिती त्यांनी दिली. 

मसूद अझरला जागतिक आतंकवादी ठरविल्याविषयी बोलताना बंबवाले म्हणाले, ‘मसूद अजझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे हा भारताचा मुत्सद्दी विजय आहे. दहशतवादाविरोधीचं युद्ध आणखी मोठे आहे, दहशतवादाच्या लढाईतील हा एक छोटासा विजय म्हणावा लागेल. मसूद अजहर आणि अल कायदा यांच्यामधील संबंधांचे पुरावे सादर करण्यात आपण यशस्वी ठरलो. फ्रान्स, युके आणि युएस यांचाही विजय म्हणावा लागेल. अशा पद्धतीने भारताने आणखी पावले उचलणेदेखील गरजेचे आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search