Next
‘बजाज’च्या पुण्यात पाच डिजिटली-सक्षम शाखा सुरू
प्रेस रिलीज
Saturday, April 20, 2019 | 04:57 PM
15 0 0
Share this article:

पुणे : बजाज फायनान्स लिमिटेड या जमा स्वीकारणाऱ्या नॉन-बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्युशनतर्फे (एनबीएफसी) पुण्यातील कँप, नळस्टॉप, फातिमा नगर, पिंपरी आणि औंध भागात डिजिटली-सक्षम फिक्स्ड डिपॉझीट सेवा शाखा सुरू केल्या आहेत. येत्या दोन वर्षांत कंपनीची ४० ते ५० शाखा सुरू करण्याची योजना आहे.

या शाखा इंटरअॅक्टीव्ह डिजिटल काउंटर्स, अॅलेक्सा कियॉस्क आणि वायफाय-क्षम टॅब्जनी सुसज्ज आहेत, ज्यामुळे ग्राहकांना व्यवहार, गुंतवणूक करता येईल, बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये फिक्स्ड डिपॉझिट जमा करण्यासंबंधी अधिक माहिती मिळू शकेल.

या वेळी बोलताना ‘बजाज फायनान्स’च्या रिटेल अँड कॉर्पोरेट लायबिलीटीजचे बिझनेस हेड सचिन सिक्का म्हणाले, ‘कंपनी जे पैसे उधार देते त्यात १५ टक्के जमा रकमेचा समावेश असतो. सध्याच्या अनेक माध्यमांव्यतिरिक्त डिजिटल मंचाच्या माध्यमातून आम्ही रिटेल डिपॉझिटर्स सेवा देत आहोत. फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणे वस्तूविषयक आणि पारंपरिक मालमत्तेसाठी एखादी व्यक्ती मायक्रो मार्केट स्ट्रॅटेजीला कमी लेखू शकत नाही आणि रिटेल डिपॉझिटरला जलद व सुलभ सुविधा पुरवणे मुख्य आहे. आमच्या डिजिटल-सक्षम शाखा आमच्या ग्राहकांना जमा रक्कम तसेच विमा उत्पादनांविषयी जलद माहिती देण्याच्या दृष्टीने आनंदी असतील याविषयी आम्ही सकारात्मक आहोत. ज्यामुळे प्रक्रिया वेगवान आणि सुलभ होते.’

बजाज फायनान्स लिमिटेड फिक्स्ड डिपॉझिटसाठी आकर्षक असा म्हणजेच ८.७५ टक्के व्याज दर देते आहे, जो वरिष्ठ नागरिकांसाठी ९.१० या प्रमाणे आहे. सोबतच विश्वासार्ह व्याजाची हमी आहे. त्याला ‘आयसीआरए’चे एमएएए (स्टेबल) रेटिंग आणि ‘क्रिसिल’चे एफएएए/स्टेबल रेटिंग असल्याने सुरक्षा आणि स्थिरतेची हमी राहते. ग्राहकांना १२ ते ६० महिन्यांच्या लवचिक कालावधी पर्यायासोबत २५ हजार रुपये इतक्या कमी रकमेसह फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करता येते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search