Next
मुंबईच्या विकासासाठी भाजपा हाच सक्षम पर्याय!
BOI
Friday, February 17, 2017 | 12:00 AM
15 4 1
Share this article:

मुंबई शहर सुरक्षित व विकसित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सक्षम पर्याय दिला असून महापालिका निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमताने विजयी करा, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरूवारी केले.
 
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वरळीमध्ये जिजामातानगर येथे भाजपाच्या प्रचारसभेत मा. प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी उमेदवार नवनीत पांडे, भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी. व उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संतोष पांडे उपस्थित होते.
 
मा. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, मुंबई शहरात प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी, चांगले रस्ते व वाहतूक सुविधा मिळण्यासाठी भाजपाने आपल्या वचननाम्यात आश्वासने दिली आहेत. महापालिकेत सत्तेवर आल्यावर भाजपा सर्व आश्वासने पूर्ण करेल. मुंबईला विकसित करण्यासाठी व सुरक्षित शहर करण्यासाठी महापालिका निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमताने निवडून द्या.
 
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यांची कामगिरी जनतेला पसंत पडली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक नगराध्यक्षपदे व सर्वाधिक नगसेवकपदे जिंकली. राज्यात भाजपाची ताकद वाढली आहे. त्याचप्रमाणे महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा नंबर वन असेल.
 
त्यांनी सांगितले की, महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण संपूर्ण राज्याचा दौरा केला. सर्वत्र भाजपाला पाठिंबा दिसून आला. त्यामुळे सर्व दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपाच यशस्वी होईल.
 
ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शहरांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. राज्य सरकारनेही शहरांच्या विकासासाठी पावले टाकली. संपूर्ण मुंबई शहरात सीसीटीव्हीचे जाळे सरकारने निर्माण केले.
 
 
 
15 4 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Neha About
No
0
0

Select Language
Share Link
 
Search