Next
विदर्भातील शेतकऱ्यांची थेऊरला भेट
प्रेस रिलीज
Saturday, April 14, 2018 | 06:02 PM
15 0 0
Share this article:

थेऊर : येथील राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित व अत्याधुनिक शेतीपूरक रोपांची निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये विदर्भातील प्रगतशील शेतकऱ्यांनी भेट देऊन उत्पादनाची माहित घेतली.

रोपांचे उत्पादन व विक्री करणारी ही अग्रगण्य संस्था आहे. अत्याधुनिक साधने व तंत्रज्ञान याचा योग्य वापर करून सर्वात्तम दर्जाचे उत्पादने व सेवा ग्राहकांना पुरवली जाते. विशेषतः केळी या वाणाचे लागवड विदर्भातील अकोट, अमरावती या क्षेत्रातील होऊ लागली आहे. जागतिक बाजार पेठेत चीनसारख्या देशांना केळी पुरवठा करणारे फिलिपिन्स, इक्वेडोर हे देश ही मागे पडले आहे. सादर देशात हवामानाच्या बदलामुळे पानामाविल्टसारखे घटक वेगाने पसरत आहे. त्यामुळे मागील १० वर्षांत फळांचे उत्पादन घटले आहे. परिणामी फळ निर्यात ही घटली आहे.

हिवरखेडचे शेतीनिष्ठ पुरस्कृत शेतकरी गजानन वानखेडे व भास्कर भाऊ वानखेडे हे ऍग्रो प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून स्वतःची उत्कृष्ट दर्जेदार केळी निर्यात करीत आहेत; तसेच परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. ‘राईज एन शाईन’चे तज्ज्ञ प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याने केळी उत्पादनात वाढ झाली आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कंपनीच्या संचालिका भाग्यश्री प्रसाद पाटील व धनश्री सोमनाथ पाटील यांनी कंपनीची पुढील धोरणे व भारतीय शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे निर्यात पूरक, उत्पादन क्षम वाण उपलब्ध करून देण्याचे मनोदय व्यक्त केले; तसेच दर्जेदार रोपांची निर्मितीसाठी NCSTCP- DBT प्रमाणित रोपे पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमासाठी कंपनीचे वेगवेगळ्या राज्यातील प्रतिनिधी हजार होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत ओव्हाळ यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search