Next
‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी
शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण २७ जुलैला
BOI
Thursday, July 26, 2018 | 05:21 PM
15 0 0
Share this story

पुणे : शुक्रवारी, २७ जुलै रोजी भारतीयांना ‘लाल चंद्र’ म्हणजेच ‘ब्लड मून’ पाहण्याची संधी मिळणार आहे. या शतकातील सर्वांत मोठे म्हणजे दीर्घकाळ चालणारे खग्रास चंद्रग्रहण शुक्रवारी असून, ते १०३ मिनिटांचे असेल. या काळात चंद्र सुंदर अशा लालसर रंगात दिसेल. तसेच २७ जुलैला चंद्र पृथ्वीपासून काहीसा दूर जाणार असल्याने, तो वर्षातील सर्वांत लहान पूर्ण चंद्र असेल. या दरम्यान मंगळदेखील चंद्राच्या अगदी जवळ येणार असून, साध्या डोळ्यांनीही तो पाहता येणार आहे. १५ वर्षांनंतर ही स्थिती पहायला मिळणार आहे. काळे ढग, पाऊस नसला, तर २७च्या मध्यरात्री रात्री पूर्ण चंद्रग्रहण देशाच्या बऱ्याचशा भागात पहायला मिळेल, अशी माहिती अभ्यासकांनी दिली आहे. 

या दिवशी गुरुपौर्णिमाही आहे. ग्रहणाचे वेध दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होत असून, या काळातही गुरूपूजन करता येईल. एकाच दिवशी गुरू पौर्णिमा आणि चंद्रग्रहण यापूर्वी १६ जुलै २००० रोजी आले होते. पुढील वर्षीही ते एकत्र येणार आहे.  

शुक्रवारी रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी खंडग्रास ग्रहण सुरू होईल. ते तासाभरापेक्षा जास्त काळ चालेल. त्यानंतर खग्रास चंद्रग्रहण २८ जुलैला पहाटे एक वाजता सुरू होईल. पहाटे एक वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास चंद्र काळा दिसेल. पहाटे २.४३पर्यंत ही अवस्था राहील. यानंतर चंद्र पुन्हा खंडग्रास अवस्थेत पहाटे ३.४९ वाजता दिसेल. संपूर्ण ग्रहणाचा कालावधी सहा तास १४ मिनिटांचा असेल. सुरुवातीला चंद्र काहीसा नारिंगी, नंतर रक्तवर्णी तांबडा आणि मग करडा होऊन गडद होत जाईल. याआधीचे चंद्रग्रहण ३१ जानेवारी २०१८ रोजी झाले होते, तर पुढील चंद्रग्रहण २१ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. 

चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी आल्यानंतर चंद्रग्रहण होते. दर महिन्यात चंद्र या स्थितीतून जातो; मात्र तो पृथ्वीच्या सावलीपासून थोडा वर किंवा खालून जात असल्याने ग्रहण लागत नाही. जेव्हा ते अगदी एकासमोर एक असे येतात, त्या वेळी चंद्रावर पडणारा प्रकाश पूर्णपणे अडवला जातो आणि चंद्रग्रहण होते. 

भारतासह आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथेही हे ग्रहण दिसणार आहे. प्रशांत महासागर, हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागरातूनही हे ग्रहण दिसणार आहे.  

(या ग्रहणाचे वेध, गुरुपौर्णिमा आणि अन्य संबंधित बाबींबद्दल पुण्यातील पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितलेली माहिती पाहा सोबतच्या व्हिडिओत...)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kale dinesh About 182 Days ago
Bytes of India Is Gr8 network,,
0
0

Select Language
Share Link