Next
‘येस बँक’ व ‘पैसाबजार डॉट कॉम’ यांचा सहयोग
प्रेस रिलीज
Thursday, April 26 | 03:36 PM
15 0 0
Share this story

मुंबई : येस बँक या भारतातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने पैसाबजार डॉट कॉम या कर्जे व कार्डे यासाठीच्या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या बाजारात एपीआयआधारित एकात्मिकरणाद्वारे कर्जप्रक्रियेचे डिजिटायझेशन केल्याचे जाहीर केले आहे. अशा प्रकारची एपीआयआधारित कर्जप्रक्रिया पहिलीवहिली असून, त्यामध्ये ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी पैसाबजार डॉट कॉम सुविधा थेट बँकेच्या मूलभूत प्रक्रियेमध्ये एकात्मिक करण्यात आली आहे. आतापर्यंत या एपीआयआधारित सुविधेवर १५५ कोटी रुपयांसाठी तीन हजार ६८७ लॉगिन करण्यात आली आहेत.

पैसाबजार डॉट कॉमच्या मदतीने ग्राहकांसाठी ही सुविधा विकसित करणारी येस बँक ही मोजक्या वित्तीय संस्थांपैकी एक आहे. येस बँकेने २०१७मध्ये पैसाबजार डॉट कॉमबरोबर केलेल्या धोरणात्मक भागीदारीच्या पार्श्वभूमीवर, सध्याच्या ग्राहकांना विशिष्ट अटींवर कर्जे मंजूर करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. या एपीआयआधारित मॉडेलमुळे पैसाबजार डॉट कॉमवरून पसंतीची बँक म्हणून येस बँकेकडे अर्ज करणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला कर्जाची सुरळीत प्रक्रिया अनुभवता येणार आहे.

याविषयी बोलताना येस बँकेचे ग्रुप प्रेसिडेंट व ग्रुप हेड, ब्रँच व रिटेल बँकिंग राजन पेंटल म्हणाले, ‘या एपीआयआधारित कर्ज प्रक्रियेमुळे कर्जाच्या पद्धतीला एक विशिष्ट स्वरूप येणार आहे व कर्जासाठी लागणारी कागदपत्रांची प्रक्रिया कमी करण्यासाठी व त्यामुळे निर्णय घेण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी बहुतांश प्रक्रिया डिजिटाइज केली जाणार आहे. येस बँक व पैसाबजार डॉट कॉम यांच्यातील सहयोगामुळे या दोन्ही कंपन्यांमध्ये अशा प्रकारचे पहिले मॉडेल विकसित केले जाणार आहे व ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी विस्तार व प्रमाण वाढवण्यासाठी मदत करणार आहे. यामुळे येस बँक व पैसाबजार डॉट कॉम या दोहोंना खर्च व प्रक्रिया सक्षम करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.’

पैसाबजार डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक नवीन कुकरेजा म्हणाले, ‘पैसाबजार डॉट कॉममध्ये आमचे उद्दिष्ट योग्य वित्तीय उत्पादन निवडत असताना ग्राहकांना पूर्णतः सहकार्य करणे, हे आहे. या वर्षी, ग्राहकांना जास्तीत जास्त सोय देण्यासाठी तंत्रज्ञान व माहिती यांचा अधिकाधिक वापर करण्यावर आमचा भर असणार आहे. येस बँकेमध्ये एपीआयचे एकात्मिकरण हे त्या दिशेने टाकलेले पाऊल असून, त्यामुळे ग्राहकांना पैसाबजार डॉट कॉम वापरण्याचा अधिक उत्तम अनुभव मिळणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link