Next
‘उबर इट्स’ची सेवा पुण्यात सुरू
Press Release
Friday, January 05 | 03:53 PM
15 0 0
Share this story

पुणेः घरपोच खाद्यसेवा देणारे ‘उबर इट्स’ हे ऑन डिमांड फूड डिलिव्हरी अॅप आता पुणे शहरातही दाखल झाले आहे. याद्वारे तीनशे रेस्टॉरंटसशी भागीदारी करून पुणे शहर व आजुबाजूच्या परिसरातील ग्राहकांना खाद्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

सध्या विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि संगमवाडी या परिसरात ही सेवा देण्यात येत असून, आता पुणेकरांना त्यांचे आवडते खाद्यपदार्थ त्यांच्या आवडत्या मलाका स्पाईस,  चैतन्य पराठाज् आणि ब्लू नाईल यांसारख्या विविध रेस्टॉरंटमधून घरबसल्या मागवता येणार आहेत.

याबाबत बोलताना उबर इट्स इंडियाचे प्रमुख भाविक राठोड म्हणाले, ‘सात शहरांमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता ‘उबर इट्स’ने पुणे शहराकडे कूच केली आहे. प्रसिद्ध  रेस्टॉरंटसशी भागीदारी करून  चांगले अन्नपदार्थ लोकांना पुरवण्यासाठी कटीबद्ध असलेल्या उबर इट्सला ग्राहकांचा चांगला पाठिंबा लाभला आहे. भारतीय लोक राईडसाठी जास्तीत जास्त  वापरत असलेल्या उबर अॅपचा 'उबर इट्स' हा स्वतंत्र भाग असून केवळ एका बटणावर वेगात फूड डिलीव्हरी करता यावी, यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे.पुणे शहर हे महाविद्यालये व कार्पोरेट कंपन्यांचे माहेरघर असल्याने येथे हे अॅप सादर करताना आम्हाला फार उत्साह व आनंद वाटत आहे. पुणेकरांचे  खाद्यसंस्कृतीवर फार प्रेम आहे. या शहरात अनेक छोट्या खाणावळी, कॅफेज् आणि फाईन डाईन रेस्टॉरंट आहेत. आमचे भागीदार आणि उबर डिलीव्हरी नेटवर्कच्या मदतीने पुणेकरांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठीचे उत्तम अन्न पुरवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.’

उबर इट्सची सुरुवात २०१४ मध्ये लॉसएन्जेलिस येथे एक छोटेखानी डिलिव्हरी पायलट म्हणून करण्यात आली. त्यानंतर, २०१५ मध्ये टोरंटो इथे याला स्वतंत्र अॅप्लीकेशनचा दर्जा देण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत अत्यंत जलद, दर्जेदार अन्नपदार्थ पुरवणारे हे एकमेव व्यासपीठ ठरले असून आता २९ देशांमधील या १३० शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. भारतात, मे २०१७ मध्ये मुंबईत 'उबर इट्स'ची सुरुवात झाली. अवघ्या सात महिन्यात ही सेवा मुंबई, दिल्ली, गुडगाव, बेंगळूरू, चेन्नई, चंडीगड, हैद्राबाद आणि आता पुण्यातही सुरू करण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link