Next
‘प्रलं’च्या स्मृतिप्रीत्यर्थ १६ जूनला रत्नागिरीत नाट्यमहोत्सव
BOI
Thursday, June 13, 2019 | 03:06 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : कोकणचे सुपुत्र असलेले ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर (प्रल) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे १६ जून २०१९ (रविवार) नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी ‘प्रलं’वर केलेला लघुपट या वेळी दाखविण्यात येणार आहे. (लघुपटाचा प्रोमो शेवटी दिला आहे.) तसेच कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानतर्फे ‘राजा ओयदिपौस’ आणि कुडाळच्या बाबा वर्दम थिएटर्सतर्फे ‘आहे मनोहर तरी’ हे दीर्घांक या महोत्सवात सादर होणार आहेत.

या वेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्यासह रत्नागिरीमधील दोन ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलमधील रंजन मंदिरात रविवारी सायंकाळी चार वाजता सुरू होणार आहे.

रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

नाट्य परिषदेच्या सभासदांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला जाणार असून, त्याद्वारे सर्व सभासदांना परिषदेच्या कार्यक्रमांची माहिती पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे सभासदांनी आपले व्हॉट्सअॅप क्रमांक खालील क्रमांकावर कळवण्याचे आवाहन कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.

सतीश दळी : ९४२२० ५४१६७
प्रफुल्ल घाग : ९४२२४ २९३०१
सनातन रेडीज : ९४२११ ५६१८९

(प्र. ल. मयेकर यांच्याबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search