Next
कास पठारावरील रानफुलांच्या बहराला सुरुवात; यंदाचा हंगाम सुरू
पाऊस अधिक असल्याने दहा सप्टेंबरनंतर अधिक बहरण्याचा अंदाज
BOI
Wednesday, September 04, 2019 | 04:56 PM
15 0 0
Share this article:


पुणे : दुर्मीळ जातीच्या रानफुलांनी बहरणारे कासचे पठार बघण्यासाठीची पर्यटक, अभ्यासकांची प्रतीक्षा आता संपली आहे. एक सप्टेंबरपासून वन विभागाने येथे भेट देण्याकरिता नावनोंदणी सुरू केली आहे.  


‘दर वर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारा कास पठारावरील फुलांचा हंगाम यंदा पावसामुळे लांबला आहे. आता काही फुले फुलायला लागली असून, पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरत आहे; मात्र तीन सप्टेंबरपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने फुले फुलण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. ऊन पडले तर फुले चांगली बहरतील. साधारण दहा सप्टेंबरनंतर पठार चांगले बहरेल,’ अशी माहिती कास पठार समितीचे सोमनाथ जाधव यांनी दिली. एक सप्टेंबरपासून सुमारे दोन हजार पर्यटकांनी येथे भेट दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. 


‘युनेस्को’ने कास पठाराला ‘वर्ल्ड हेरिटेज साइट’चा दर्जा दिल्यानंतर गेल्या सात वर्षांत फुले बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दर वर्षी साधारण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पठारावर फुलांचे ताटवे फुलायला सुरुवात होते. त्यामुळे हौशी छायाचित्रकार, पर्यटक, अभ्यासक पठार बघायला येतात. यंदा मात्र पाऊस जास्त असल्याने इथली रानफुले फुलण्यास उशिरा सुरुवात झाली आहे. साधारण ऑक्टोंबरअखेरपर्यंत हा हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे.


तीन वर्षांपूर्वी कास पठाराला भेट देणाऱ्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेल्याने इथली जैवविविधता धोक्यात आली होती. सुट्टीच्या दिवशी पठारावर ५० ते ६० हजार पर्यटक हजेरी लावत होते. त्यामुळे वन विभागाने पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणली आहे. या वर्षीदेखील सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या तीन वेळांमध्ये तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांनी आठवड्यातील इतर दिवशी पठारावर यावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. येथे जाण्याआधी ऑनलाइन बुकिंग करणे आवश्यक असून, त्यासाठी https://www.kas.ind.in/ या वेबसाइटला भेट द्यावी, असेही वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

(कास पठाराविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 16 Days ago
Tourists can destroy . Strict control is absolutely necessarily . It should be rigorously , mecifully enforced . Environment around the Everest Is a disaster .
0
0
Manjushree Ulhe About 16 Days ago
I would like to visit kas pathar .at September end
0
0

Select Language
Share Link
 
Search