Next
खुळा पाऊस
BOI
Tuesday, August 01, 2017 | 06:21 PM
15 0 0
Share this article:

‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’मध्ये आज पाहू या कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर यांची ‘खुळा पाऊस’ ही कविता.
...................
पाऊस खुळा । किती पाऊस खुळा!
शिंपडून पाणी, आई! भिजवि फुला ।।ध्रु.।।

नाचे किती वेड्यापरी, 
बडबडे कांहींतरी
झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ।।१।।

दीनवाणी वेलीबाई, 
पांघराया नाहीं कांहीं
काय करूं, उघडा हा राहे छकुला! ।।२।।

उचलून आणूं काय,
पुसूं डोकें, अंग, पाय?
काकडून गेला किती बघ माकुला! ।।३।।

निजवूं या गादीवर,
पांघरूण घालू वर,
देऊं काय, सांग आई, आणून तुला? ।।४।।

काय – “नको तोडूं फूल,
वेल - पावसाचें मूल?
ऊन येतां चमकेल त्याचा डोळुला?” ।।५।।

आणि “येऊं मी घरांत?
भिजूं नको अंगणात?”
नको आई-! चमकेन मीही आपुला! ।।६।।

मज वेडा म्हणतील?
फूल शहाणें होईल? 
मग वेडा म्हणतील सगळे तुला!।।७।।

- कवी गिरीश (शंकर केशव कानेटकर)

(कवितेची चाल : झिम्मा खेळूं ये)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
धनश्री अजित जोशी पुणे About 57 Days ago
अप्रतिम केवळ अप्रतिम
0
1
धनश्री जोशी पुणे About 57 Days ago
खूपच छान...सुंदर
0
1

Select Language
Share Link
 
Search