Next
हिमायतनगरच्या तीन नगरसेवकांना दिलासा
नागेश शिंदे
Thursday, February 21, 2019 | 12:50 PM
15 0 0
Share this storyहिमायतनगर : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीवेळी तिसऱ्या आघाडीच्या शिवसेना उमेदवाराला मतदान करून पक्षासोबत बंडखोरी केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या मो. जावेद गनी, शमीमबानो अनवर खान पठाण व सुरेखा सदाशिव सातव तीन नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. या आदेशाला २१ फेब्रुवारी २०१९ रोजी नगर विकास राज्यमंत्री रणजित  पाटील यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे या तिघांनाही तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

हिमायतनगर नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी हे पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होते. त्या वेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना संधी न देता आपल्या मर्जीतील अ.अखिल यांना संधी दिल्यामुळे नाराज झालेल्या व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी तिसऱ्या आघाडीच्या शिवसेनेला मतदान करून नगराध्यक्षपद कुणाल राठोड यांच्याकडे, तर उपनगराध्यक्षपद स्वतःकडे ठेवले होते. या प्रकरणी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी त्या तिन्ही नगरसेवकांना अपात्र ठरवून पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी २० फेब्रुवारीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे हिमायतनगर येथील नगरपंचायतच्या नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. स्थगितीचे वृत्त समजताच नगराध्यक्ष कुणाल राठोड व उपनगराध्यक्ष मो. जावेद गनी यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link