Next
‘आयएचसीएल’चे महाराष्ट्रात १७वे हॉटेल
प्रेस रिलीज
Monday, April 30 | 04:17 PM
15 0 0
Share this story

मुंबई : इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (आयएचसीएल) ‘अॅस्पिरेशन २०२२’ या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत लोणावळ्यातील प्रवेशाची घोषणा केली आहे. कंपनीने काकडे समूहाचा भाग असलेल्या वाइल्ड्स अॅंड वॉटर डेव्हलपर्ससोबत व्यवस्थापन कंत्राटाच्या माध्यमातून ताजचे नवीन हॉटेल सुरू करण्यासाठी करार केला आहे. भारतामध्ये सर्वाधिक आरामदायी हॉटेल्स चालवणारी कंपनी हे ‘आयएचसीएल’चे स्थान या घोषणेमुळे आणखी भक्कम झाले आहे.

‘आयएचसीएल’च्या रिअल इस्टेट आणि विकास विभागाच्या कार्यकारी उपाध्यक्ष सुमा वेंकटेश या वेळी म्हणाल्या, ‘आमचे नवीन आरामदायी (लीझर) हॉटेल लोणावळ्यात आणण्यासाठी काकडे समूहासोबत भागीदारी झाल्याचा आम्हाला आनंद आहे. आरामदायी हॉटेलिंगच्या क्षेत्रातील स्थान अधिक बळकट करण्यावर आमचा कायम भर राहिला आहे आणि मुंबई व पुणे या दोन्ही महानगरांतील तसेच भोवतालच्या भागांतील पर्यटकांसाठी लोणावळा हे मोक्याचे ठिकाण असल्याने ही आमच्यासाठी मोठी संधी आहे.’

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी ताज ब्रॅंडेड रिसॉर्ट उभे राहणार आहे. पवना तलावातील नितळ पाण्याच्या सान्निध्यात, निसर्गरम्य डोंगरांच्या पार्श्वभूमीवर ३० एकर भूभागावर हे रिसॉर्ट बांधले जाणार असून, यामध्ये १५० खोल्या, दिवसभर खुले राहणारे रेस्तराँ, स्पेशालिटी रेस्टोरंट आणि बार या सुविधा असतील.  

काकडे समूहाचे विक्रम काकडे म्हणाले, ‘प्रतिष्ठेच्या ताज ब्रॅंडसोबत भागीदारी करण्याची तसेच त्यांचे सुप्रसिद्ध आदरातिथ्य लोणावळ्यात आणण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. या भागीदारीच्या माध्यमातून (आमचे विकसन भागीदार डेव्हिड लाझारस यांच्यासह) महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे ताज रिसॉर्ट उभारण्याचे आणि ग्राहकांना एक आगळा अनुभव देण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे.’

लोणावळा हे छोटेसे शांत गाव महाराष्ट्रातील आघाडीचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले आहे. एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणून गेली अनेक वर्षे मुंबई व पुण्यातील पर्यटकांची पसंती लोणावळ्याला आहे.

काकडे समूहाविषयी :

काकडे समूह हा महाराष्ट्रातील आघाडीच्या बांधकाम आणि विकसन समूहांपैकी एक असून,  कंपनीकडे बांधकाम आणि विकासकामांचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. आतिथ्य आस्थापने, मॉल्स, गृहनिर्माण तसेच टाउनशिप विकासाच्या असंख्य आगामी प्रकल्पांमध्ये काकडे समूहाचा सहभाग आहे.

‘आयएचसीएल’विषयी :

‘आयएचसीएल’ आणि तिच्या उपकंपन्या असा अनेक ब्रॅंड्स व व्यवसायांचा समूह भारतीय आतिथ्यशीलता व जागतिक दर्जाची सेवा यांचा मिलाफ साधून काम करत आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी स्थापन केलेल्या या कंपनीने आपले पहिले हॉटेल ताजमहाल पॅलेस मुंबईत १९०३ साली सुरू केले आणि आज जगातील चार खंडांत, ११ देशांमधील ७२ ठिकाणी कंपनीची १४५ हॉटेल्स आहेत.

बाजारपेठेतील भांडवलाचा विचार करता ‘आयएचसीएल’ ही दक्षिण आशियातील सर्वांत मोठी भारतीय हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. ‘बीएसई’ व ‘एनएसई’च्या प्राथमिक सूचींमध्ये कंपनीचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link