Next
‘हेमंत पाटील यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करू’
नागेश शिंदे
Monday, April 01, 2019 | 11:33 AM
15 0 0
Share this article:हिमायतनगर : ‘शिवसेना-भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार हेमंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार करा,’ असे आवाहन राजश्री पाटील यांनी केले.

हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या निवासस्थानी कार्यकर्ता भेटीगाठीच्या कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू झाली असून, आमदार पाटील यांच्या पत्नी राजश्री यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ३० मार्च २०१९ रोजी हिमायतनगर येथे नगराध्यक्ष राठोड यांच्या निवासस्थानी त्यांनी धावती भेट दिली. त्यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनाही त्या भेटल्या. ‘येणाऱ्या काळात आपण सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करून हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन पंतप्रधान नरेंद मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी नगराध्यक्ष कुणाल राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  गजानन तुप्तेवार, तालुका संघटक संजय काईतवाड, शहरप्रमुख प्रकाश रामदींनवार, विजय वळसे पाटील, नगरसेवक विनायक मेंडके, सावन डाके, युवासेना तालुकाप्रमुख विशाल राठोड, संतोष गाजेवर, बाळूआना चवरे, गजानन चायल, बंडू अंनगुलवार, बंडेवार शावकर, गजानन हरडपकर, रामू नरवाडे, सालीम शेवाळकर, विनोद, शेख मोशीन, दुर्गेश मांडोजवार, वैभव डांगे, साई देशमवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search