Next
एन to पी : नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन
BOI
Monday, December 10, 2018 | 10:03 AM
15 0 0
Share this story

रुग्णांच्यादृष्टीने डॉक्टर देव असतात; पण त्यांच्याही आयुष्यात सर्वसामान्यांप्रमाणे सुख-दुःख, ताण-तणाव, आनंदाचे, संकटाचे किंवा आर्थिक अडचणींचे प्रसंग येत असतात. अशा प्रसंगांना डॉ. सोपान चौगुले यांनी ‘एन to पी (नोटबुक टू प्रिस्क्रिप्शन)’ या पुस्तकातून शब्दरूप दिले आहे.
 
गावाकडच्या रुग्णामुळे डॉक्टरांना त्यांच्या बालपणीचा वैरणीसाठी केलेल्या वणवणीचा प्रसंग आठवतो. ‘खेळ’ या लेखात क्रिकेट खेळत असताना पडून डोक्याला बसलेला किरकोळ मार मधूसाठी जीवघेणा ठरला हा प्रसंग कथन केला आहे. त्यांचे सासरे चंद्रकांत शिंदे यांच्या प्रामाणिक स्वच्छ व एकनिष्ठेचे अनुभव सांगितले आहेत.

डॉक्टर चार-पाच वर्षांचे असताना थोरल्या आईबरोबर परगावी पाहुण्यांकडे गेल्यावर घडलेला चहाचा किस्साही छान रंगवला आहे. आई-वडिलांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून दहावीची सहामाही परीक्षा असूनही, रात्री शेतात मळणी व सकाळी परीक्षा असे दिवस काढताना आयुष्याच्या ‘परीक्षे’त पास झालेला अनुभव बरेच काही सांगतो, असे अनेक लेख यामध्ये आहेत.  

पुस्तक : एन to पी : नोटबुक टू प्रिस्क्रीप्शन
लेखक :
डॉ. सोपान चौगुले
प्रकाशक : ह्रदय प्रकाशन
पाने : १३२
किंमत : १३५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link