Next
मराठी भारतीमार्फत कल्याण येथे प्रजासत्ताक दिन
मिलिंद जाधव
Tuesday, January 29, 2019 | 12:40 PM
15 0 0
Share this story



कल्याण : मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या आणि प्रामुख्याने मराठी भाषेवर काम करणाऱ्या मराठी भारती संघटनेमार्फत कल्याण येथील सिद्धार्थ नगर विभागात ७०वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. विभागातील मुलांसोबतच इतर मुलांनीही या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

कल्याण येथील स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक संदीप खांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी इतर मागासजातीय इन्कलाबच्या अध्यक्षा व मराठी भारती संघटनेच्या कार्यवाह विजेता वैशाली वामन भोनकर, स्थानिक महिला प्रतिनिधी ललिता आखाडे, ठाणे विद्यार्थी भारतीचे अध्यक्ष सर्वेश सुजाता लवांडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link