Next
‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन
प्रेस रिलीज
Friday, July 28, 2017 | 06:38 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित व आनंद गानू व सुनीता गानू लिखित ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी, एक ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी मुंबईत होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. विजय जोशी, अरुण जोशी, हर्षवर्धन भावे, डॉ. अजय राणे, डॉ. मंदार बिच्चू, रवींद्र व नंदिनी नेने, डॉ. दिनेश केसकर, नोआ मेसील, अमित वायकर, नंदकुमार ढेकणे, प्रशांत खरवडकर ही ग्रंथातील मान्यवर मंडळी या वेळी उपस्थित राहणार असून, वाचकांशी संवाद साधणार आहेत.

‘गर्जे मराठी’ हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राची पताका जागतिक पातळीवर फडकत ठेवणाऱ्या ३३ प्रतिभाशाली मान्यवरांच्या कर्तृत्वाचा शब्दरूप आविष्कार आहे. या पुस्तकाला डॉ. माशेलकर यांची प्रस्तावना लाभली आहे. ‘जगभरात आपल्या विविधांगी कर्तृत्वाने तळपणाऱ्या महाराष्ट्रीय प्रतिभेचा प्रतीकात्मक आविष्कार म्हणजे ‘गर्जे मराठी,’’ असे डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी म्हटले आहे. तसेच, ‘भारताचा इतिहास आणि प्रगती यात महाराष्ट्राचा मोलाचा सहभाग आहे. जगभरातील अनेक देशांत महाराष्ट्रीय प्रतिभा नव्या पिढ्यांच्या रूपात मुखर होताना दिसत आहे. या सुखद बदलाचे प्रतिबिंब म्हणजे ‘गर्जे मराठी,’’ असे पद्मविभूषण डॉ. अविनाश दीक्षित यांनी म्हटले आहे.

या पुस्तकाचा आकार ११ x ९.५ असा असून, ते हार्ड बाउंड आहे. संपूर्ण पुस्तकासाठी आर्टपेपर वापरण्यात आला असून, हे ३६० पानी पुस्तक संपूर्ण रंगीत आहे. ‘ग्रंथाली’च्या वतीने हे पुस्तक स्व. एकनाथ ठाकूर यांना अर्पण करण्यात आले आहे. ‘‘गर्जे मराठी’ या पुस्तकाची किंमत १२५० रुपये असून, कार्यक्रमस्थळी ते ८०० रुपयांत उपलब्ध असेल. ‘ग्रंथाली’ची अन्य पुस्तकेही नेहमीच्या सवलतीत उपलब्ध असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल,’ असे ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी सांगितले आहे.

कार्यक्रमाविषयी :
‘गर्जे मराठी’ पुस्तकाचे प्रकाशन
दिवस : मंगळवार, एक ऑगस्ट २०१७
वेळ : दुपारी, बारा वाजता
स्थळ : वीर सावरकर सभागृह, चौथा मजला, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Avinash khedkar About
All the best, congratulations 👍👍👌👌
0
0
Varsha Kavishwar About
All the best!
0
0
Sharad Apte About
This is very important event. Now a days hundreds and thousands Indian works abroad and many of them contribute wellness of human race. Among them my cousin brother Mr. Ashok Gadgil. He is featuring in this book. I from Sangli and want to book copy.
0
0

Select Language
Share Link
 
Search