Next
आंगणेवाडी येथे भराडी मातेचा जत्रोत्सव आजपासून..
BOI
Friday, March 03, 2017 | 05:21 PM
15 2 0
Share this article:

मालवण : भराडी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी आज आंगणेवाडी भाविकांचा जनसागर लोटला आहे. आई भराडी देवी नमो नम: च्या जयघोषाने आंगणेवाडीचा परिसर दुमदुमन गेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या भाविकांनी भराडी मातेचे दर्शन घेत नवस फेडले. यात्रेच्या भाविकांमुळे आंगणेवाडीनगरी भक्तिमय झाली. यासाठी आंगणेवाडीत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातून भाविक देवी दर्शनासाठी येतात. मुंबईमधून चाकरमानी मोठया प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचा उत्सव तीन दिवस चालतो, पण भाविकांची गर्दी २ मार्च रोजी मोठया प्रमाणात असणार आहे. 

या यात्रेसाठी पोलीस व होमगार्ड मिळून ३५० कर्मचारी सुरक्षिततेसाठी असणार आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्री, विरोधी पक्षाचे नेते, मुंबई महापालिकेचे नेते या उत्सवात दर्शनासाठी हजेरी लावतात. पूर्वी मुंबईतील गुन्हेगार क्षेत्रातील अनेकजण देवीच्या दर्शनाला हमखास उपस्थित राहत होते. श्री देवी भराडीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सरबत, आरोग्य तपासणी अशा सुविधादेखील राजकीय पक्ष देत असतात. जिल्ह्यातून देखील मोठया प्रमाणात भाविक उपस्थिती दर्शवितात.

भराडीदेवीचे महात्म्या : 

भराडी देवी आंगणेवाडी मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. श्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. 'भरड' भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते कि, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत. देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहित. असे या नवसाला पावणाऱ्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रात्सवाला तर भाविकांचा पूरच येतो. या देवीचा जत्रात्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. सामन्यपणे दिवाळीनंतर ग्रामस्थ देवीला कौल लावून शिकारीला जातात. जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही. जेव्हा शिकार मिळते व तिचे ग्रामभोजन होते त्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करुन जत्रात्सवाच दिवस निश्वित केला जातो.

 

 
15 2 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
PRAMOD GAONKAR About 352 Days ago
Me malwani
0
0

Select Language
Share Link
 
Search