Next
मौनांतर मूकनाट्य स्पर्धेत ‘रायसोनी’चे यश
प्रेस रिलीज
Wednesday, August 01, 2018 | 11:29 AM
15 0 0
Share this storyपुणे : वाघोली येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मौनांतर २०१८’ या मूकनाट्य स्पर्धेत यश मिळवत उत्तेजनार्थ पदक पटकावले. ड्रीम्स रिऍलिटी, वाइड विंग्स मीडिया आणि फेअरी टेल मीडिया यांच्या वतीने ही मूकनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती.

अभिनव जेऊरकर या विद्यार्थ्याला उत्तम पटकथेसाठी, तर किरण कांबळेला उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत एकूण २७ संघ सहभागी झाले होते. त्यातील २० पुण्यातले, तर ७ मुंबईचे होते. पुण्यातील भरतनाट्य मंदिर व मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा झाली. प्रसाद वनारसे आणि गिरीश परदेशी यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.

महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली. रायसोनी शिक्षण संस्थेचे संचालक अजित टाटिया, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, उपक्रम समन्वयक प्रगती कोरडे यांनी उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link