Next
‘महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारू दे’
प्रेस रिलीज
Wednesday, September 19 | 11:40 AM
15 0 0
Share this story

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारू दे, असे साकडे घातले. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचेही दर्शन घेतले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय भावंडे अशी ओळख असलेले अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब मुंबईतील लालबागचा राजा आणि सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. या वेळी पवार यांच्या पत्नी सुनेत्रा, तसेच सुप्रिया यांचे पती सदानंद सुळे उपस्थित होते.

‘आज राज्य आर्थिक संकटात आले आहे, महागाई वाढली आहे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. बलात्कार, महिला अत्याचाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात रोज नवीन भ्रष्टाचार बाहेर येत आहेत, अशा परिस्थितीत राज्याला सावरण्याची गरज आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत राज्यातली परिस्थिती नीटनेटकी होवो,’ अशी प्रार्थना राज्यातील जनतेच्या वतीने पवार आणि सुळे कुटुंबीयांनी केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link