Next
‘सुपरमाइंड’तर्फे मोफत समुपदेशन सप्ताह
प्रेस रिलीज
Thursday, May 31, 2018 | 12:27 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत बोलताना मंजुषा वैद्य.शेजारी मेघना मुळे, वैशाली केसकर, योगिनी भोसले व मधुरा मुळे

पुणे : ‘येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवी व दहावी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमात बदल होत आहेत; तसेच दहावी सीबीएसईच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. हा बदल नेमका काय आणि कसा आहे याबद्दल आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी सुपरमाइंड संस्थेतर्फे मोफत समुपदेशन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती सुपरमाइंड संस्थेच्या संचालिका मंजुषा वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समुपदेशिका मेघना मुळे, वैशाली केसकर, योगिनी भोसले व मधुरा मुळे या वेळी उपस्थित होत्या.

वैद्य म्हणाल्या, ‘या सप्ताहाला एक जून २०१८पासून सुरुवात होत असून, १० जूनपर्यंत रोज सकाळी ११ ते ८ यावेळेत विद्यार्थी व पालक समुपदेशनासाठी येऊ शकतात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून दहावी व आठवीचे पाठ्यपुस्तके, पॅटर्न व मुल्यमापनात बदल होत आहेत. कृतियुक्त (Activity Based), उपयोजित (Application Based), कौशल्याधारित व क्षमताधिष्ठित ज्ञान रचनावादावर आधारित या अभ्यासक्रमाबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या मनात खूप संभ्रम आहेत, तसेच सीबीएससी बोर्डाने सीसीई पॅटर्न काढून संपूर्ण पाठ्यपुस्तकावर आधारित वार्षिक परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. ज्यामुळे अभ्यासाचे नियोजन, विषयवार वेळापत्रक याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात अनेक अनेक व्याख्याने होत आहेत; पण प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक पातळीवर भेटून सर्व शंकांचे निरसन होणे गरजेचे असल्यामुळे सुपरमाइंड संस्थेने या या उपक्रमाचे आयोजन केले आहे.’

‘या समुपदेशन सप्ताहात आठवी ते दहावीचे विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत समुपदेशन घेऊ शकतील. एक जूनपासून ‘शिक्षक भवन’, निवारा वृद्धाश्रमासमोर, नवी पेठ, पुणे येथे हे समुपदेशन वर्ग होणार आहेत. समुपदेशनासाठी पालकांनी वेळ निश्चित करून येणे आवश्यक आहे. सुपरमाइंड संस्थेने आयोजिलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षण प्रक्रियेत दुवा साधला जाईल व विद्यार्थ्यांना अभ्यासाची शास्त्रशुद्ध दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो,’ असे वैद्य यांनी नमूद केले.

समुपदेशिका केसकर म्हणाल्या, ‘या बदलांना सामोरे कसे जावे, अभ्यास पद्धतीत नेमके कोणते बदल करावेत, गुण व गुणवत्ता वाढविण्याचे विशेष तंत्र कोणते, पाठ्यपुस्तक व दैनंदिन जीवनातील गोष्टी नव्या अभ्यासक्रमात कशाप्रकारे समाविष्ट आहेत, याबद्दलचे सर्व प्रश्न समुपदेशनातून चर्चिले जातील. अशा प्रकारच्या समुपदेशनातून पालक व विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रश्नांची कोंडी फुटते व ताणरहित अभ्यासासाठी दिशा मिळते.’

समुपदेशन सप्ताहाविषयी :

कालावधी : एक जून ते १० जून २०१८
वेळ : सकाळी ११ ते आठ.
स्थळ : शिक्षक भवन, निवारा वृद्धाश्रमासमोर, नवी पेठ, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९०४९९ ९२८०७/८/९
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link