Next
‘एअरटेल’तर्फे ‘आयपीएल’चे अनलिमिटेड फ्री स्ट्रीमिंग
प्रेस रिलीज
Monday, April 09, 2018 | 11:59 AM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘एअरटेल’चा लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप ‘एअरटेल टीव्ही’ त्याच्या युजर्सना विवो आयपीएल २०१८ मधील सर्व लाइव्ह सामने व त्यांच्या क्षणचित्रांचे अनलिमिटेड फ्री स्ट्रीमिंग देणार आहे. ‘हॉटस्टार’च्या माध्यमातून हे स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

याव्यतिरिक्त या आनंदामध्ये अधिक भर करण्यासाठी एअरटेल ‘एअरटेल टीव्ही’ अॅपचे नवीन व्हर्जन दाखल करत आहे. अॅपच्या या नवीन व्हर्जनमध्ये क्रिकेटचा रोमांच सामावलेला आहे. यामुळे युजर्सना सर्व लाइव्ह सामन्यांच्या उत्साहपूर्ण व रोमांचक क्षणांचा अनुभव मिळणार आहे. एअरटेल टीव्ही अॅपचे युजर्स आता ‘एअरटेल टीव्ही’ अॅपच्या माध्यमातून आपल्या आवडत्या संघांला पाठिंबा देऊ शकतात, लाइव्ह सामन्याची माहिती मिळवू शकतात आणि आगामी आयपीएल सीजनच्या शेड्यूलबाबत माहिती मिळवू शकतात. युजर्सना क्रिकेट सामन्यांची सविस्तर माहिती मिळण्यासाठी खास स्कोअरकार्ड नोटिफिकेशन्सची सुविधा देखील दाखल करण्यात येणार आहे. अॅपच्या या नवीन व्हर्जनमध्ये इंटरअॅक्टिव्ह गेम्स व कंटेंट्सचा देखील समावेश असणार आहे. ज्यामधून युजर्सना आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

‘आयपीएल’मधील सर्व सामन्यांच्या अनलिमिटेड फ्री स्ट्रीमिंगचा आनंद घेण्यासाठी एअरटेल ग्राहकांनी एअरटेल टीव्ही अॅपचे नवीन व्हर्जन (अँड्रॉईड व आयओएसवर उपलब्ध) इन्स्टॉल करणे गरजेचे आहे. नवीन युजर्स देखील हे अॅप डाऊनलोड करू शकतात, तर विद्यमान युजर्सना आपोआप अॅप अपडेट करण्याचे नोटिफिकेशन मिळेल. नॉन-एअरटेल युजर्सने यासाठी एअरटेल ४-जी सीम घेणे गरजेचे आहे. स्मार्टफोनच्या सीम स्लॉट एकमध्ये सीम इन्सर्ट करा आणि ही सुविधा मिळण्यासाठी स्टेप एक फॉलो करा.

जानेवारी व फेब्रुवारी २०१८ दरम्यान भारतात एअरटेल टीव्ही अॅप हे सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेले ओटीटी अॅप ठरले. जून २०१८पर्यंत एअरटेल टीव्ही अॅपवरील सर्व कंटेंट एअरटेल पोस्टपेड व प्रीपेड ग्राहकांसाठी फ्री आहे. रोमांचक लाइव्ह आयपीएल सामन्यांच्या एअरटेल टीव्ही अॅप हे लाइव्ह टीव्ही ते चित्रपट, मालिका, ओरिजिनल सिरीजपर्यंत सर्वोत्तम मनोरंजन देणारे अॅप ठरेल.

भारती एअरटेलमधील कंटेंट व अॅप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर बत्रा म्हणाले, ‘आमच्या कंटेट विभागामध्ये आगामी ‘आयपीएल’च्या अनलिमिटेड लाइव्ह सामन्यांच्या स्ट्रीमिंगची भर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आता एअरटेल टीव्ही अॅपचे युजर्स क्रिकेटमधील सर्वात मोठ्या महासंग्रामामधील लाइव्ह सामन्यामधील कोणताही क्षण चुकवणार नाहीत. ते जेथे असतील तेथे या महासंग्रामाचा आनंद घेऊ शकतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link