Next
‘नृत्यसंध्या’ कार्यक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Saturday, December 15, 2018 | 01:15 PM
15 0 0
Share this article:



पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘नृत्यसंध्या’ या ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यर्कम भारतीय विद्या भवनच्या सरदार नातू सभागृहात १४ डिसेंबर २०१८ रोजी. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

आकांक्षा ओडिसी नृत्यालयाच्या संस्थापिका रसिका गुमास्ते, त्यांच्या शिष्या आणि शुभदा वराडकर यांच्या शिष्या शमा अधिकारी यांनी हा कार्यक्रम सादर केला. यात ऋतुजा पवळे, अलिशा शिरोळे, गौरी शुक्ल, मुग्धा कुलकर्णी, पूजा काळे यांचा समावेश होता.



मंगलाचरण, पल्लवी, उडिया अभिनय आदी मोहक नृत्यप्रकार या दरम्यान सादर करण्यात आले. संत ज्ञानेश्वर यांच्या ‘घणू वाजे घुन घुणा’ या विराणीवर आधारित ओडिसी नृत्य सादर करण्यात आले. अनेक मराठी गीतेही ओडिसी नृत्यावर सादर करण्यात आली. उडिया अभिनय रसिका गुमास्ते यांनी सादर केला. वसंत बापट यांच्या ‘नदी’ या काव्यावर आधारित नृत्य सादर केले; तसेच शमा अधिकारी यांनी ‘गीत गोविंद’मधील अष्टपदी सादर केली. हरीये गती, मोक्ष हे प्रकारही सादर करण्यात आले. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक रत्ना साहा यांनी कलाकारांचे स्वागत केले. कित्तूर यांनी निवेदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shyam Kale About 161 Days ago
Very nice
0
0

Select Language
Share Link
 
Search