Next
‘एफबीबी कलर्स मिस इंडिया’ विजेत्यांचा गौरव
प्रेस रिलीज
Monday, May 21 | 04:49 PM
15 0 0
Share this story

'एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया'स्पर्धेतील पश्चिम विभागातील विजेत्या मेहक पंजाबी,  अनुष्का लुहार, निकिता सोनी आणि  आश्ना गुरव

पुणे :  ‘एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया २०१८’ स्पर्धेत पश्चिम विभागातून विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांच्या सन्मानार्थ नुकतेच येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरेगाव पार्क येथील नितेश हबमधील प्रशस्त आणि दिमाखदार एफबीबी स्टोअरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. एफबीबी हे फ्युचर ग्रुपतर्फे चालवले जाणारे  भारतातील एक आघाडीचे फॅशन स्टोअर आहे. ‘एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया २०१८’ स्पर्धेचे ते मुख्य प्रायोजक आहेत.

या वेळी एफबीबीचे  मार्केट मॅनेजर विनय उपाध्याय म्हणाले, ‘ही स्पर्धा म्हणजे निव्वळ एक व्यासपीठ नाही, तर अनेक तरुण मुलींचे स्वप्न आहे. या मुकुटापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत लागते. या कार्यक्रमातून आम्ही या विजेत्यांचा सन्मान करू इच्छितो आणि त्यांचे हे यश साजरे करत आहोत.’
या वेळी महाराष्ट्रातील  मेहक पंजाबी, गुजरातची अनुष्का लुहार, राजस्थानची  निकिता सोनी आणि गोव्यातील आश्ना गुरव यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचा  ग्रँड फिनाले मुंबईत जून मध्ये होणार आहे.

(‘एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया २०१८’ स्पर्धेचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link