Next
नेपोलिअन हिल, केशव सदाशिव रिसबूड
BOI
Thursday, October 26, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

‘थिंक अँड ग्रो रिच’सारखं तुफान खपाचं पुस्तक लिहून लोकांना यशाचे मार्ग दाखवणारे नेपोलिअन हिल आणि ‘केसरि’ असं आपल्याच नावाच्या आद्याक्षरांच्या टोपणनावाने लेखन करणारे केशव सदाशिव रिसबूड यांचा २६ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..........

नेपोलिअन हिल 

२६ ऑक्टोबर १८८३ रोजी व्हर्जिनियामध्ये जन्मलेला नेपोलिअन हिल हा यशाचे मार्ग दाखवणाऱ्या पुस्तकांचा लेखक म्हणून गाजला. त्याआधी त्याने पत्रकारिता केली होती आणि ऑटोमोबाइल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कारची असेंब्लीही शिकवली होती. 

त्याचं १९२८ सालचं ‘दी लॉ ऑफ सक्सेस’ हे पहिलंच पुस्तक गाजलं. त्यानंतर आलेल्या ‘दी मॅजिक लॅडर टू सक्सेस’लाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला होता; पण त्याला तुफान प्रसिद्धी आणि खरी लोकप्रियता मिळाली ती त्याच्या ‘थिंक अँड ग्रो रिच’ या पुस्तकाने. हे पुस्तक सार्वकालिक बेस्ट सेलर्सच्या यादीत मानाचं स्थान टिकवून आहे.
 
आउटविटिंग दी डेव्हिल, हाउ टू सेल युअर वे थ्रू लाइफ, दी मास्टर की टू रिचेस, हाऊ टू रेझ युअर ओन सॅलरी, ग्रो रिच विथ पीस ऑफ माइंड, यू कॅन वर्क युअर ओन मिरॅकल्स अशी त्याची अनेक स्फूर्तिदायी पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

आठ नोव्हेंबर १९७० रोजी त्याचा नॉर्थ कॅरोलायनामध्ये मृत्यू झाला.
...................

केशव सदाशिव रिसबूड

२६ ऑक्टोबर १८३८ रोजी जन्मलेले केशव रिसबूड हे आपल्या नावाच्या आद्याक्षरांनी म्हणजे ‘केसरि’ या टोपणनावाने लेखन करत असत. 

व्यवहारपद्यसहस्र, यशवंत चरित्र, श्री शिवछत्रपती (भाग पहिला) अशी त्यांची काही मोजकी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

चार नोव्हेंबर १९०० रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rajesh Shashikala Ramrao Dhakarke About
Very Good about एक् "ढ" मूलाची गोष्ट.
2
0

Select Language
Share Link
 
Search