Next
... तर पर्यटकाला कृषी पर्यटन खेचून आणेल
दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, March 18, 2019 | 04:17 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘ग्रामीण-शहरी गरजांची सांगड घातली गेली, कल्पकेने पर्यटकांपर्यंत पोहोचले, तर निसर्ग, शेती, मोकळ्या हवेची ओढ पर्यटकाला कृषी पर्यटनाकडे खेचून आणेल,’ असा सूर दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेत उमटला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरी-जुन्नर येथील पराशर कृषी पर्यटन केंद्रात दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत सात जिल्ह्यांतून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

या दोन दिवसीय कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, बँकेचे अधिकारी सचिन मस्के, आमंत्रण कृषी पर्यटनचे शशिकांत जाधव, मनोज हाडवळे, गणेश चप्पलवार आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक हरणे यांनी कृषी पर्यटनासाठी उपयुक्त आणि पूरक योजनांची माहिती देऊन कृषी पर्यटनासंबंधी भविष्यातील योजनेविषयी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कृषी पर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अडचण आल्यास संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सचिन मस्के यांनी कार्यशाळेसाठी उपस्थित असलेला शेतकऱ्यांना कृषी पर्यटनासाठी मिळणारा पतपुरवठा, विविध बँकिंग योजना, पर्यटन कर्ज, मुद्रा योजना यांचे सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसनही केले. आमंत्रण कृषी पर्यटन केंद्राचे संचालक जाधव यांनी कृषी पर्यटनाबरोबर इतर जोडव्यवसाय, शहरातील पैसा ग्रामीण भागात कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कसा आणू शकतो, कृषी पर्यटन व्यवसायात रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणावर कशा उपलब्ध होत आहेत, यांविषयी मार्गदर्शन केले.

कृषी पर्यटन केंद्रांना काळाची गरज म्हणून नव माध्यमे, डिजिटल, तसेच समाज माध्यमे किती महत्त्वाचे आहेत, मार्केटिंग व जाहिरात तंत्र, सोशल मीडियाचा असलेला जागतिक प्रभाव, वेबसाइटचे फायदे, कीवर्ड आणि कंटेंटचा वापर करून आपली वेबसाइट गुगल सर्च करताना कशी प्रथम निदर्शनास आणू शकतो या विषयी कृषी पर्यटन विश्वचे संचालक चप्पलवार यांनी मार्गदर्शन केले.

कृषी पर्यटनातील संधी, सद्यस्थिती, भविष्य, कृषी पर्यटनाबरोबरच विविध महोत्सव आणि उपक्रम कसे राबवावे याचे मार्गदर्शन मनोज हाडवळे यांनी केले. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील यशस्वी झालेला द्राक्ष महोत्सवासारखे महोत्सव कशा पद्धतीने राबवू शकतो, या विषयी या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search