Next
प्रियांका चोप्रा पुन्हा बॉलीवूडमध्ये
‘द स्काय इज पिंक’मधून बॉलीवूडपटात दिसणार
BOI
Friday, February 22, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this story


मुंबई : सोनाली बोस दिग्दर्शित ‘द स्काय इज पिंक’ हा बॉलीवूडपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून अभिनेत्री प्रियांका चोप्रा बऱ्याच काळानंतर बॉलीवूडपटात दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता फरहान अख्तर आणि झायरा वसिम हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘आयशा चौधरी’ नावाच्या मुलीची ही कथा आहे. वयाच्या १८व्या वर्षीच जगाचा निरोप घेतलेल्या आयशाला लहानपणापासूनच वक्तृत्व कलेची देणगी लाभलेली असते. मृत्यूपूर्वी आपल्या आयुष्यावर आधारित ‘माय लिटल एपिफेनिस’ नावाचे एक पुस्तक ती लिहिते. तिच्या या पुस्तकावर आधारित ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट आहे. अभिनेत्री झायरा वसिम चित्रपटात आयशाची भूमिका साकारत असून प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर तिच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

प्रियंका चोप्रामार्च २०१६मध्ये आलेल्या प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ चित्रपटानंतर प्रियंका या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये दिसणार आहे. बऱ्याच काळानंतर ती पुन्हा पडद्यावर दिसणार असून तिचे चाहते यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link