Next
नाट्य निर्माता क्रीक डू सोलेएल नोव्हेंबरमध्ये मुंबईत
प्रेस रिलीज
Tuesday, June 12, 2018 | 03:15 PM
15 0 0
Share this article:

टुरिंग शोजचे उपाध्यक्ष फिन टेलर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई : जगातला सर्वात मोठा नाट्य निर्माता क्रीक डू सोलेएल यांनी मुंबईत त्यांची कला सादर करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भारताची मनोरंजन राजधानी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. भारतातील त्यांचे पहिले सादरीकरण येत्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बुक माय शो’चे संस्थापक आशिष हेमराजानी यांच्यासह कॅनडाच्या माँट्रियल येथे टुरिंग शोजचे उपाध्यक्ष फिन टेलर आणि क्रीक डू सोलेएल यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी या बातमीला दुजोरा दिला.

जगभरातील प्रतिभांना एक मंच उपलब्ध करून देणारा आणि सॉफ्ट पॉवर म्हणून झपाट्याने पुढे येणारा देश अशी भारताची प्रतिमा बनविण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. क्रीक डू सोलेएल यांचा, भारत दौरा मुंबईतून सुरू करण्याचा निर्णय, महाराष्ट्राचा पर्यटनाविषयी असलेला दृष्टीकोन अधोरेखित करतो. म्हणूनच हा दौरा राज्य शासनाच्या ‘व्हिजिट महाराष्ट्र’ (महाराष्ट्राला भेट द्या) या पर्यटनाला चालना देण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग बनविला आहे.

या वर्षीच्या सुरुवातीला एनसीपीए येथे बुक मे शोची निर्मिती असलेल्या डिस्नेच्या जगद्विख्यात अल्लादिन या बहुचर्चित कलाकृतीच्या सादरीकरणासाठी मुंबईलाच पहिली पसंती दिली होती. जेव्हा जगातील सर्वात जास्त चाललेल्या ब्युटी अँड द बीस्ट हा कार्यक्रम डिस्नेने २०१५ साली सर्वप्रथम भारतात आणला, तेव्हा त्या कार्यक्रमासाठीही मुंबईनेच भारताचे दरवाजे खुले केले होते.

एक अब्ज अमेरिकी डॉलरची उलाढाल असलेले आणि वार्षिक दहा मिलियन तिकीट विक्री असलेल्या क्रीक डू सोलेएल यांनी KA, Corteo आणि Mystere सारख्या गाजलेल्या नाटकांची निर्मिती केली आहे. आपल्या एकमेवाद्वितीय आणि अचाट नेपथ्यासाठी नावाजलेली ही कंपनी आज वेगळ्याच जगातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘बुक माय शो’च्या सहकार्याने भारतात होत असलेली ही सुरुवात राज्याच्या पर्यटनाला चालना तर देईलच; परंतु त्याचबरोबर मुंबईकरांसाठी एक विशेष सांस्कृतिक आणि कलाकृतीचा अनुभव असेल. हे सादरीकरण बांद्रा कुर्ला संकुल येथील मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या मैदानावर केले जाईल.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search