Next
गुरुनाथ नाईक, सूर्यकांत, डॉ. रवी बापट
BOI
Saturday, June 02, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

शिलेदार, गरुड, सूरज, गोलंदाज, रातराणी, सागर, बहिर्जी अशा एकाहून एक सरस पात्रांच्या हजारहून जास्त रहस्यकथा लिहून अफाट लोकप्रियता मिळवणारे गुरुनाथ नाईक, कथाकार वि. वि. बोकील, अत्यंत रुबाबदार आणि देखणे अभिनेते सूर्यकांत, ज्येष्ठ समीक्षक गं. ना. जोगळेकर आणि प्रख्यात डॉक्टर आणि लेखक रवी बापट यांचा दोन जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......  

गुरुनाथ विठ्ठल नाईक 
दोन जून १९३८ रोजी जन्मलेले गुरुनाथ नाईक हे रहस्यकथाकार म्हणून अफाट लोकप्रिय असणारे पत्रकार. त्यांनी हजारहून जास्त रहस्यकथा लिहिल्या आहेत. आपल्या घराण्याचं ‘नाईक’ हे मूळ आडनाव वापरून, तसंच ‘हेमचंद्र साखळकर’ नाव वापरून त्यांनी काही लेखन केलं होतं. त्यांनी काही संगीतिका आणि श्रुतिकाही लिहिल्या होत्या. 

कॅप्टन दीपच्या ‘शिलेदार’कथा, मेजर अविनाश भोसलेच्या ‘गरुड’कथा, उदयसिंह राठोडच्या ‘गोलंदाज’कथा, सूरजच्या ‘शब्दवेधी’ कथा, रजनी काटकरच्या ‘रातराणी’ कथा, जीवन सावरकरच्या ‘सागर’कथा आणि बहिर्जी नाईकच्या ‘बहिर्जी’ कथा, अशा एकाहून एक सरस पात्रांच्या सुरस आणि मनोवेधक रहस्यकथा लिहून त्यांनी रहस्यकथा प्रांतात आपलं अढळ स्थान निर्माण केलं.

(गुरुनाथ नाईक यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

विष्णू विनायक बोकील

दोन जून १९०३ रोजी जन्मलेले विष्णू विनायक बोकील हे कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होते.  

फोल आशा, झंझावात, चाल पुढे, तू तिथं मी, तारांबळ, चिमुकला संसार, लगीनघाई, माहेरघर, गुडघ्याला बाशिंग, मायेशी शाल, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. पहिली मंगळागौर, जरा जपून, गळ्याची शपथ, बेबी, याला जीवन ऐसे नाव, सप्तपदी - अशा चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलं होतं. 

२२ एप्रिल १९७३ रोजी त्यांचं निधन झालं.
.......

वामन तुकाराम मांडरे

दोन जून १९२६ रोजी कोल्हापूरमध्ये जन्मलेले वामन तुकाराम ऊर्फ सूर्यकांत मांडरे म्हणजे एके काळी मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेले देखणे, धिप्पाड देहयष्टीचे बलदंड नायक! त्यांनी आपले ज्येष्ठ बंधू चंद्रकांत यांच्यासह अनेक चित्रपटातून नायकांच्या विविध भूमिका साकारल्या; पण शिवाजी आणि संभाजी सकारावेत तर त्यांनीच! त्यांनी अनेक नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. 

‘धाकटी पाती’ हे आत्मचरित्र आणि विश्वकर्मा, कोल्हापुरी साज अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कार, तसंच महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

२२ ऑगस्ट १९९९ रोजी त्यांचं निधन झालं. 

(सूर्यकांत मांडरे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.......

डॉ. गंगाधर नारायण जोगळेकर

दोन जून १९३५ रोजी जन्मलेले डॉ. गंगाधर नारायण जोगळेकर हे ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी भाषेचे प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा अनेक वर्षं सांभाळली होती.

महाराष्ट्र आणि मराठी भाषा, साहित्य समीक्षा : स्वरूप आणि विकास, मराठी वाङ्मयाचा अभिनव इतिहास, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१४ ऑगस्ट २००७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(गं. ना. जोगळेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

रवींद्र दिनकर बापट

दोन जून १९४२ रोजी बालाघाटमध्ये (मध्य प्रदेश) जन्मलेले रवींद्र दिनकर ऊर्फ डॉ. रवी बापट हे अत्यंत निष्णात डॉक्टर आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.
 
अचूक निदान, स्वास्थ्यवेध, वॉर्ड नंबर पाच - केईएम, पोस्टमॉर्टेम, अशी त्यांची मराठी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ‘वॉर्ड नंबर पाच-केईएम’साठी त्यांना साहित्य पुरस्कार मिळाला आहे.    

(डॉ. रवी बापट यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search